गाव नमुना १-अ (वन जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

मागील लेखामध्ये आपण गाव नमुना १ (जमिनींची नोंदवही) आणि गाव नमुना १ चा गोषवारा विषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे, या लेखामध्ये गाव नमुना १-अ (वन जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

गाव नमुना १-अ (वन जमिनींची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १-अ (वन जमिनींची नोंदवही)

ज्या गावात पाचपेक्षा अधिक भूमापन क्रमांक 'वन' म्हणून अधिसूचित करण्यात आलेले असतात अशाच गावात हा स्वयंस्पष्ट नमुना ठेवला जातो. पाचपेक्षा कमी भूमापन क्रमांक 'वन' म्हणून अधिसूचित करण्यात आलेले असतील तर वनाबाबतचा आवश्यक सर्व तपशील गाव नमुना क्रमांक एकच्या स्तंभ आठ मध्ये ( सार्वजनिक मार्गाधिकार आणि सुविधाधिकार ) घ्यावा. 

गाव नमुना एक - अ च्या स्तंभ ( १ ) मध्ये, जर वन जमिनींचा भूमापन क्रमांक देण्यात आला असेल तर तो लिहावा. जर भूमापन क्रमांक देण्यात आला नसेल तर त्या क्षेत्राची स्वयंस्पष्ट खूण लिहावी. 

स्तंभ ( २ ) मध्ये, वन विभागाकडून जर काही वन क्रमांक दिला गेला असल्यास तो वन क्रमांक लिहावा. 

स्तंभ ( ३ ) मध्ये, जरी वन अभिनियमान्वये ग्राम वन किंवा महसूल विभागाने घोषित केलेले वन असले तरी ते क्षेत्र हेक्टर - आर मध्ये नमूद करावे. 

स्तंभ ( ४ ) मध्ये संरक्षित वनाचे ( असल्यास ) क्षेत्र हेक्टर - आर मध्ये नमूद करावे. 

स्तंभ ( ५ ) मध्ये राखीव वनाचे ( असल्यास ) क्षेत्र हेक्टर - आर मध्ये नमूद करावे. 

स्तंभ ( ६ ) मध्ये वन जमाबंदी अधिकाऱ्याने, अधिनियमान्वये काही अधिकार अभिलिखित केलेले असतील तर त्याची नोंद घ्यावी. 

स्तंभ ( ७ ) हा शेरा स्तंभ आहे. 

गाव नमुना १-अ (वन जमिनींची नोंदवही)

गाव नमुना एक-अ तयार झाल्यावर तलाठी यांनी वन विभागाच्या अभिलेखांबरोबर वन क्षेत्राचा मेळ घ्यावा. त्यावर स्वाक्षरी करावी, त्यानंतर त्यावर वन जमाबंदी अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी. शेवटी तहसिलदाराने यावर स्वाक्षरी करावी. तहसिलदाराने गाव नमुना क्रमांक एक वर स्वाक्षरी करण्याआधी वन विभागाच्या अभिलेखांबरोबर वन क्षेत्राचा मेळ घेतल्याची खात्री करावी. 

हेही वाचा - गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments