मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक - अन्यथा, त्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही

गावच्या ठिकाणी शिक्षक, ग्रामसेवक व वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सर्वच जिल्हा पातळीवर काम करणारे कर्मचारी त्यांच्या नेमणुकांच्या ठिकाणी राहत नाहीत अशी तक्रार आपल्याला ऐकायला मिळते, तसेच ग्रामीण भागामध्ये काही गावात/तांड्यावर ग्रामसेवक, डॉक्टर, शिक्षक इत्यादी कर्मचारी वेळेवर हजर नसतात. हे लोक गावांमध्ये मुख्यालयात मुक्काम न करता जवळच्या जिल्हा/तालुका मुख्यालयात राहतात. 

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक - अन्यथा, त्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही

ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची अट आता अंगलट येणार आहे. मुख्यालयी राहत असल्याचा ग्रामसभेचा ठराव त्यांना द्यावा लागणार आहे. अन्यथा, त्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही, असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता गावपातळीवर कार्यरत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, सहायक यांना मुख्यालयी राहावेच लागण्याची वेळ येणार आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती दिल्या जाणाऱ्या वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. ग्रामस्थांना त्यांच्याकडून दिल्या जाणाºया सेवांसाठी मुख्यालयी राहावेच लागते. त्यामध्ये ग्रामसेवक, आरोग्यसेवक, शिक्षकांचा समावेश आहे; मात्र हे सर्व कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखले घेऊन मुख्यालयी राहत असल्याचे भासवतात. प्रत्यक्षात मुख्यालयी न राहताच घरभाडे भत्ता वसूल करतात. ही बाब पंचायत राज समितीच्या २०१७-१८ च्या अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आली. त्यामध्ये ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले. त्यानुसार शासनाने कर्मचाऱ्यांबद्दलच्या धोरणात बदल केला आहे. कर्मचाऱ्यांनी रहिवासी दाखला कोणाकडून घ्यावा, हे ठरवून देण्यात आले. ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला. वित्त विभागाच्या ७ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या निर्णयातील अट विचारात घेऊन बदल करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांनी मुख्यालयी राहत असल्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील कर्मचा-यांनी मुख्यालयी रहाण्याच्या द्दष्टीने आवश्यक त्या सूचनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा - ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व अटी (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments