बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे आले नसतील तर असा भरा ऑनलाईन फॉर्म

राज्यात केाविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या लेखात आपण  बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे आले नसतील तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते सविस्तर पाहूया.

बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे आले नसतील तर असा भरा ऑनलाईन फॉर्म


माहे जुलै 2020 ते 22.04.2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने नोंदणी झालेल्या बाांधकाम कामगारांपैकी ज्या बाांधकाम कामगारांनी अद्याप नोंदणी फी व वर्गणीची रक्कम जिल्हा कार्यालयात जमा केलेली नाही अशा बाांधकाम कामगारांनी खालील तक्यात नमदू तपशिलानुसार नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात जमा करावी व तसे लिंक वर कळवावे यानसुार मंडळाकडून रू.1500/- प्रमाणे अर्थसहाय्याची रक्कम नोंदीत बाांधकाम कामगाराांच्या बँक खाती जमा करण्यात येईल.


Confirmation of payment for registration fee and contribution fee payment:

नोंदणी आणि सभासद वर्गणी फी भारल्यानंतर खालील लिंक वर क्लिक करा आणि फी जमा केल्याचा खालील तपशील फॉर्म मध्ये भरा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdcgA9P2SaoDUUVSc7l8r-499jiJuKsbpWHPi0CLdsxPL7FMQ/viewform

 1. पहिले नाव / First Name
 2. मधले नाव / Middle Name
 3. आडनाव नाव / Last Name 
 4. भ्रमणध्वनी क्रमांक / Mobile Number
 5. आधार क्रमांक / Aadhaar Number
 6. जिल्हा / District
 7. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत कामगार नोंदणी फी जमा केलेली बँक पावती (₹ २५/-) / Bank slip for depositing Maharashtra Building and Other Construction Worker's Welfare Board worker (₹ 25/-) 
 8. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत कामगार सभासद वर्गणी फी जमा केलेली बँक पावती (₹ १२/-) / Bank slip for depositing Maharashtra Building and Other Construction Worker's Welfare Board worker subscription fee (₹ 12/-) 
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

3 Comments

 1. सर. आज अर्ज करू शकते क्या?

  ReplyDelete
 2. मी 2013 पासून बांधकाम कामगार म्हणून काम करत आहे, पण मला "बांधकाम कामगार" म्हणून नोंद कुठे व कशी करायची हे मला काही न समजल्यामुळे मी नोंदनी करू शकलो नाही तरी मला मार्गदर्शन करावे ही विनंती.

  ReplyDelete
  Replies
  1. बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर
   https://www.msdhulap.com/2021/01/bandhkam-kamgar-kalyankari-yojana-and-How-to-Register-bandhkam-kamgar-Online.html

   Delete