पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर 'अशी' करा तक्रार

पंतप्रधान किसान सन्मान निधीमधील (PM Kisan Samman Nidhi) आठव्या हप्त्याची 2000 रुपयांची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येत आहे. मात्र, एखाद्या शेतकऱ्याला या योजनेंतर्गत पैसे मिळाले नसतील, तर काळजीची काहीही गरज नाही.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर 'अशी' करा तक्रार

सरकारच्या मार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, एखाद्या शेतकऱ्याला या योजनेंतर्गत पैसे मिळाले नसतील, तर काळजीची काहीही गरज नाही. कारण, आता तुम्ही याची तक्रार केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करू शकता. 

हेही वाचा - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करा

शेतकऱ्यांच्या खालील विविध तक्रारी:

  1. नोंदणी केली तरी सुद्धा पैसे मिळाले नाहीत.
  2. एकाच गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही.
  3. काही लोकांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे मात्र दुसरा हप्ता नाही.
हेही वाचा - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा 

तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर 'अशी' करा तक्रार:

सर्वात आधी आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील, तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.

तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk ई मेल (Email) pmkisan ict@gov.in वर संपर्क करू शकता. इथेही काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू शकता.

अशी करा ऑनलाईन तक्रार:

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विविध तक्रारींसाठी खालील PM Kisan च्या Help-Desk पोर्टल ओपन करा. 

https://pmkisan.gov.in/Grievance.aspx

आता एक "Query Form" ओपन होईल त्यामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी "Register Query" निवडून खाली लाभार्थ्यांचा आधार क्रमांक, खाते क्रमांक, किंवा मोबाइल क्रमांक टाकून "Get Details" वर क्लीक करा. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर 'अशी' करा तक्रार

पुढे Query Form मध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती दाखवली जाईल. खालील विविध तक्रार प्रकार निवडून तक्रारिचे वर्णन करा आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.   

तक्रार प्रकार
  1. खाते क्रमांक बरोबर नाही. 
  2. ऑनलाईन अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
  3. हप्ता मिळाला नाही.
  4. बँक व्यवहार अयशस्वी(Bank Transaction Failed)
  5. आधार दुरुस्तीमध्ये समस्या, इत्यादी.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर 'अशी' करा तक्रार

हेही वाचा - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments