आर.टी.ई. (RTE) 25% योजनेअंतर्गत या विध्यार्थ्यांना मिळणार खाजगी शाळेत मोफत शिक्षण, पहा मोबाईलवर ऑनलाईन यादी

 महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेश 2021 साठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. आता आरटीई प्रवेश 2021 तारीख, शाळा यादी, प्रवेश प्रक्रिया आणि लॉटरी ऑनलाईन तपासू शकतात.

आर.टी.ई. (RTE) 25% योजनेअंतर्गत या विध्यार्थ्यांना मिळणार खाजगी शाळेत मोफत शिक्षण,  पहा मोबाईलवर ऑनलाईन यादी

आर.टी.ई. योजनेअंतर्गत निवड झालेल्या विध्यार्थ्यांची यादी कशी पाहायची?

आर.टी.ई. योजनेअंतर्गत निवड झालेल्या विध्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करून आर.टी.ई. ची पोर्टल ओपन करा.

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

आर.टी.ई. ची पोर्टल ओपन झाल्यावर त्यामध्ये "Selected/ मूळ निवड यादी" या पर्यायावर क्लिक करा. पुढे "शैक्षणिक वर्ष" आणि तुमचा जिल्हा निवडून ""Go" पर्यायावर क्लिक करा.

नंतर पुढे तुम्हाला तुमचे यादी मध्ये नाव दिसेल. ती यादी आपण PDF फाईल मध्ये सेव्ह करू शकता.

आर.टी.ई. (RTE) 25% योजनेअंतर्गत या विध्यार्थ्यांना मिळणार खाजगी शाळेत मोफत शिक्षण,  पहा मोबाईलवर ऑनलाईन यादी.

विध्यार्थ्यांच्या पालकांसाठी सूचना:

1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२१-२०२२ या वर्षाकरिता लॉटरी द्वारे पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून sms प्राप्त होतील.

2) पालकांनी फक्त SMS वर अवलंबून राहू नये . पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याकरिता आर.टी.ई. पोर्टल वर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

3) ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरी मध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता sms द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.

4) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-

a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती

b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे.

5) पडताळणी समितीकडे प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये.

6) मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.

7) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.

8) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल

9) निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे /बाहेरगावी असल्याने/किंवा अन्य कारणामुळे पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी समितीशी संपर्क करून whats app /email किंवा अन्य माध्यमांच्या द्वारे बालकाच्या प्रवेशाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.

सूचना: लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टल वर सूचना दिली जाईल. Covid 19 मुळे पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये. प्रतिक्षा यादीतील (waiting list )पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये . त्यांच्या करिता rte पोर्टल वर स्वतंत्र सूचना दिल्या जातील.

हेही वाचा - जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments