घरेलू कामगार महिलांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये - संचारबंदी मदत पॅकेजचा नवीन शासन निर्णय

 कोविड - १९ च्या प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत व नूतनीकरण केलेल्या पात्र घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य करणे बाबतचा दि. ३० एप्रिल २०२१ रोजी नवीन शासन निर्णय घेण्यात आला.

घरेलू कामगार महिलांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये - संचारबंदी मदत पॅकेजचा नवीन शासन निर्णय

घरेलू कामगार महिलांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये - संचारबंदी मदत पॅकेज:

राज्यामध्ये कोविड -१९ या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दि. १३ एप्रिल, २०२१ रोजी राज्यातील जनतेला संबोधित करताना घरेलू कामगारांना आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केलीहोती. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन अधिसूचना, दि.१२/८/२०११ अन्वये गठित केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे घरेलू कामगार कल्याण मंडळ नियम, २०१० मध्ये विहित केलेल्या तरतुदीनुसार नोंदणी व नूतनीकरण केलेल्या पात्र घरेलू कामगारांना एकवेळचे आर्थिक सहाय्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई कार्यालयाने संदर्भ क्र. २ च्या प्रस्तावान्वये मागणी केल्यानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नुतनीकरण झालेल्या घरेलू कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात सक्रिय व जीवित नोंदणी असलेल्या एकूण १,०५,५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी रु.१,५००/- प्रमाणे (१,०५,५०० * १,५००) एकूण रू.१५,८२,५०,०००/- इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

१. त्यानुसार १,०५,५०० घरेलू कामगारांच्या थेट बँक खात्यात DBT द्वारे प्रत्येकी रुपये १,५००/-इतका निधी एकरकमी वाटप करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) करणार.

२. वरील अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई कार्यालयाने आर्थिक निधी वाटप प्रक्रियेसाठी क्षेत्रीय कार्यालय यांना मार्गदर्शन करणार.

३. यावर होणारा खर्च व मागणी क्रमांक के-४,२२३०-कामगार व सेवायोजन, ०१ कामगार, १११, कामगारांकरिता सामाजिक सुरक्षितता, (००)(११) घरेलू कामगार कल्याण मंडळाला सहाय्यक अनुदान (कार्यक्रम) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (२२३०५३४५) या लेखाशीर्षाखाली सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या मंजूर तरतुदी मधून भागविण्यातयेणार.

४. विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई कार्यालयाने अनुदान/वितरणाचा अनुपालन अहवाल सादर करणार.

या योजनेअंतर्गत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा - बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे आले नसतील तर असा भरा ऑनलाईन फॉर्म

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments