फेरीवाले व पथविक्रेत्यांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये - (प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना)

कोविड -१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकृत फेरीवाले व पथविक्रेत्यांना रुपये रू.१५००/- ची आर्थिक सहायता करणे बाबतचा आज दि. २९ एप्रिल २०२१ रोजी नवीन शासन निर्णय घेण्यात आला.

फेरीवाले व पथविक्रेत्यांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये - (प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना)

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२१ मध्ये कोविड-१९ च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत राज्यातील फेरीवाले व पथविक्रेते यांच्या व्यवसायावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे फेरीवाले व पथविक्रेते या दुर्बल घटकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर बाब लक्षात घेता मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दि.१३/०४/२०२१ रोजी दुर्बल घटकांसाठी पॅकेज जाहीर केलेले आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व अधिकृत पथविक्रेत्यांना रु.१५००/-ची आर्थिक मदत देण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे.

फेरीवाले व पथविक्रेत्यांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये - (प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजना):

१) कोविड-१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अधिकृत पथविक्रेत्यांना रु.१५००/- ची सहाय्यता रक्कम देण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आली आहे.

२) कोविड -१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले व पथविक्रेते यांना प्रत्येकी रू.१५००/- याप्रमाणे आर्थिक मदत देण्यासाठी रु ६१.७५ कोटी (रुपये एकसष्ट कोटी पंचाहत्तर लाख फक्त) इतका निधी सहआयुक्त तथा सहसंचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे वितरीत करण्यास शासनाने याद्वारे मान्यता दिली आहे.

३. उपरोक्त आर्थिक सहाय्यतेसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेत अर्ज केलेल्या फेरीवाले व पथविक्रेत्यांना ग्राह्य धरले जाईल.

४. राज्यातील PM-SVANIDHI मध्ये दि.१५/०४/२०२१ पर्यंत एकूण ४११७४५ पथविक्रेत्यांनी अर्ज केलेले आहेत. सदर लाभाचे पॅकेज दि.१५/०४/२०२१ पर्यंत PM-SVANIDHI मध्ये अर्ज केलेल्या पथविक्रेत्यांना लागू करण्यात येईल.

५. सदर निधी आहरीत करून वितरित करण्यासाठी सह आयुक्त तथा सहसंचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना नियंत्रक अधिकारी तसेच संबंधित सहाय्यक संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

६. सदरचा निधी सर्व महानगरपालिकांना तसेच सर्व नगरपरिषदा/नगरपंचायती यांना वितरित करण्यातआला आहे. सदर निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यातआल्या आहेत.

या योजनेअंतर्गत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा - बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे आले नसतील तर असा भरा ऑनलाईन फॉर्म

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !! 

Post a Comment

0 Comments