महाडीबीटी पोर्टलद्वारे या शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू

शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस आले नाहीत त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन लॉगिन करून आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. 

महाडीबीटी पोर्टलद्वारे या शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू

महा-डीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अनुदानाचे वितरण:

सन 2020-21 मध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे  महा-डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन सोडतीत शेतकऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची संपूर्ण छाननी व  मंजुरी प्रक्रीया कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी /कर्मचाऱ्यांकडून महा-डीबीटी प्रणालीवरच ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करुन जिल्हास्तरावरून पात्र लाभार्थ्यांना अनुज्ञेय अनुदानाची रक्कम अदा करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

संदर्भाधीन दि. 4 नोव्हेंबर, 2020 च्या परिपत्रकान्वये महा-डीबीटी प्रणालीवरील कृषी विभागाच्या योजना राबविण्याची कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. सदर परिपत्रकातील परिच्छेद 4.9 मधील तरतूदीनुसार महा-डीबीटी पोटलद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालय स्तरावरून प्रत्येक राज्य स्तरीय योजनेचे देयक कोषागारास पाठविणे व कोषागाराने उपलब्ध करून दिलेल्या निधीचे लाभार्थ्यांना अनुदान वितरण महा डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करावयाची आहे. तथापि, महा-डीबीटी प्रणालीवरील कृषी विभागाच्या योजनांचे लेखा कोषागारे कार्यालयाची प्रणाली यांचे एकात्मिकरणाचे (Integration) काम प्रगतीपथावर असून सदर कार्यवाही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. सबब, सन 2020-21 या वर्षात महा-डीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांचे अनुदान, यापूर्वी प्रमाणेच संदर्भाधीन दि. .27 सप्टेंबर, 2017 अन्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पीएफएमएस प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. 

महा-डीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अनुदानाचे वितरणचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी "अर्ज एक योजना अनेक", महाडीबीटी पोर्टल वर पुन्हा अर्ज सुरू

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

1 Comments