ग्रामपंचायत स्वउत्पन्नातील तीन टक्के निधी थेट अपंगांच्या बँक खात्यात जमा करणार, दिव्यांग व्यक्तींनी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

ग्रामपंचायतच्या एकूण स्वउत्पन्नातील निधीपैकी तीन टक्के निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी राखून ठेवण्याचा सरकारचा निर्णय असून, या योजनेतून देण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीचा निधी आता थेट अपंग लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत निर्गमित करण्यात आला आहे, यामुळे अपंगांसाठीची सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाच्या खरेदीसाठी थेट त्यांच्या बँक खात्यात निधी उपलब्ध करून दिला जाईल.

ग्रामपंचायत स्वउत्पन्नातील तीन टक्के निधी थेट अपंगांच्या बँक खात्यात जमा करणार, दिव्यांग व्यक्तींनी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

राज्यात सन २००१ च्या अपंग कल्याण कृती आराखड्यातील सुचनेनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्राम पंचायती) स्वउत्पन्नातील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी हा अपंग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसनासाठी राखून ठेवून त्याच कारणासाठी खर्च करावा लागतो. या निधीतून अपंगांना विविध प्रकारचे सामूहिक तसेच वैयक्तिक लाभ देण्यात येतात. यातील वैयक्तिक लाभातील वस्तूंच्या खरेदीसाठीचा निधी हा आता थेट अपंग लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याचा शासन निर्णय आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी महत्वाच्या बाबी:

ग्रामपंचायतने वैयक्तिक लाभांच्या योजनेचा निधी अपंग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खालील अटी व शर्ती विचारात घेऊन थेट जमा करण्याची कार्यवाही करावयाची आहे.

१) विहित नमुन्यातील अर्ज ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षम प्राधिकरणाने निवड केलेल्या लाभार्थ्यांकडून भरून घ्यावा.

२) लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यानंतर, अर्जामध्ये नमूद करण्यात आलेल्या वस्तू /साहित्याची किंमत विहित पद्धतीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करावी.

३) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेण्यात यावी.

४) सक्षम प्राधिकरणांच्या मान्यतेनंतर वस्तू/साहित्याची खरेदी न करता त्याकरिता, निश्चित करण्यात आलेल्या रकमेचे अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांनी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करावे.

५) अपंग लाभार्थी वास्तवास असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने अपंग लाभार्थ्यांस दिलेल्या लाभाबाबतचा अहवाल खरेदीच्या पावती सह ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेस सादर करावा.

सदर प्रकरणी ग्रामपंचायतच्या स्वनिधीमधील तीन टक्के अनुदान अपंग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करताना वरील अटी व शर्तींच्या अधीन राहून संबंधितांनी कार्यवाही करावी. संबंधित योजने संदर्भात शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अपंग प्रकारा नुसार साहित्य खरेदी:

अपंग प्रकारा नुसार खालील प्रमाणे साहित्य खरेदी करू शकता.

अंधांसाठी साहित्य खरेदी: मोबाइल फोन, लॅपटॉप, कम्प्युटर (जॉस सॉफ्टवेअर), बेल नोट वेअर, ब्रेल लेखन साहित्य, ब्रेल टाइपरायटर, टॉकिंग टाइपरायटर, लार्ज प्रिंट बुक, अल्पदृष्टी अपंगत्वावर मात करण्यासाठी डिजिटल मॅग्नीफायर्स.

कर्णबधिरांसाठी साहित्य खरेदी:  विविध प्रकारची वैयक्तिक श्रवणयंत्रे (बीटीईसह) शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, कम्प्युटरसाठीची सहाय्यभूत उपकरणे.

अस्थिव्यंग व्यक्तींसाठी साहित्य खरेदी: कॅलिपर्स, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, स्वयंचलित तीन चाकी सायकल, कुबड्या, कृत्रिम अवयव, प्रोस्थोटिक अँड डिव्हायसेस, वॉकर, सर्जिकल फूटवेअर, स्प्लिंट्स, मोबालिटी एड्स, कमोड चेअर्स, कमोड स्टूल, स्पायनल अँड नील वॉकी ब्रेस, डिव्हायसेस फॉर डेली लिव्हिंग

मतिमंदांसाठी साहित्य खरेदी: मतिमंदांसाठी शैक्षणिक साहित्य संच, बुद्धिमत्ता चाचणी संच, सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने.

बहुविकलांगांसाठी साहित्य खरेदी: संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी शिफारस केलेली सुयोग्य सहाय्यभूत साधने व उपकरणे, सीपी चेअर, स्वयंचलित सायकल व खुर्ची, कम्प्युटर वापरण्यासाठीची सहाय्यभूत उपकरणे.

कुष्ठरोगमुक्त अपंगांसाठी साहित्य खरेदी: कृत्रिम अवयव व साधने, सर्जिकल अँड करेक्टिव्ह फूटवेअर्स, सर्जिकल अप्लायन्सेस, मोबालिटि एड

स्वयंरोजगारासाठी साहित्य खरेदी: व्हेण्डिंग स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशिन, मिरची कांडप मशिन, फूड प्रोसेसिंग युनिट, झेरॉक्स मशिनची खरेदी

वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज नमुना:

या अर्जामध्ये खालील बाबी लिहून अपंग लाभार्थ्यांनी खालील अर्ज नमुना भरून ग्रामपंचायत मध्ये जमा करा. 

१)अपंग लाभार्थ्याचे संपूर्ण नाव

२)लाभार्थ्याचे अपंगत्वाचे प्रमाण (४० टक्के, ६० टक्के, ८० टक्के)

३)अपंग लाभार्थ्याच्या बँकेचे नाव व शाखेचे नाव

४)अपंग लाभार्थ्याचे बँक खाते क्रमांक ( IFS Code सह)

५) अपंग लाभार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक

६) वस्तू/साहित्य निवडून त्याची अंदाजे किंमत. इत्यादी.

अर्ज नमुना:

अपंग तीन टक्के निधी - अर्ज नमुना

हेही वाचा - दिव्यांग व्यक्ति हक्क अधिनियम २०१६ आणि पंचायतराज संस्थांमधील दिव्यांग कल्याणासाठी विशेष अनुदान व योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments