विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, विधवा, अपंग व शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्तींना मदत व्हावी तसेच गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने विशेष सहाय्य योजना सुरू करण्यात आली. या मध्ये निराधारांना जगण्याचा आधार देणाऱ्या योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना अशा अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते आपण या लेखात सविस्तर पाहूया.

विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

विधवा, अपंग, निराधार अनुदान विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस:

विधवा, अपंग, निराधार अनुदान विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील महाऑनलाईन CSC च्या वेबसाईट ओपन करा.

तुमच्याकडे लॉगिन करण्यासाठी CSC VLE युजर आयडी, पासवर्ड नसेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्रा मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

https://cscservices.mahaonline.gov.in

महाऑनलाईन CSC ची वेबसाईट ओपन झाल्यावर युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉगिन करा.

विधवा, अपंग, निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज
पोर्टल मध्ये लॉगिन झाल्यावर प्रथम आपली मराठी भाषा निवडा. त्यानंतर वरती सर्च बॉक्स मध्ये विशेष सहाय्य योजनांसाठी "Special Assistance scheme" असे सर्च करून पुढे Special Assistance scheme या पर्यायावर क्लीक करा.

विधवा, अपंग, निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

आता विविध विधवा, अपंग, निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी लागणारी  आवश्यक कागदपत्रे आपल्याला पाहायला मिळतील. ती आवश्यक कागदपत्रे पाहिल्यानंतर "पुढे सुरु करा" या पर्यायावर क्लिक करा.

विधवा, अपंग, निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

पुढे सुरु करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर विशेष सहाय्य योजनेचा अर्ज येईल त्यामध्ये "अर्जदाराचे तपशील" भरा.

अर्जदाराचे तपशील मध्ये अर्जदाराची जन्मतारीख, वय आणि दारिद्र रेषेखालील तपशील मध्ये होय/नाही निवडून "पुढे जा" या पर्यायावर क्लिक करा.

विधवा, अपंग, निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

अर्जदाराचे तपशील:

"पुढे जा" या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला पुन्हा अर्जदाराचे तपशील मध्ये पूर्ण नाव, वडिलांचे / पालकांचे नाव, लिंग, ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांक, तालुका, जिल्हा, गाव, पिनकोड, क्षेत्र, आधार क्रमांक आणि व्यवसाय हि सर्व माहिती भरायची आहे.

विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज

योजनेशी संबधित तपशील:

आता योजनेशी संबधित तपशील मध्ये प्रवर्ग, कुटुंबातील सदस्य संख्या, महाराष्ट्रात रहिवासाच्या एकूण वर्षांची संख्या, दारिद्र्य रेषेखालील कार्ड क्रमांक, दारिद्र्य रेषेखालील कार्ड जारी केल्याचे वर्ष, आणि 
जात प्रवर्ग हि सर्व माहिती भरायची आहे.

पुढे इतर शासकीय योजनांतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील आणि बँक खाते / पोस्ट ऑफिसचा तपशील मध्ये होय/नाही मध्ये निवडायचे आहे.

विधवा, अपंग, निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

कराराचे तपशील:

वरील सर्व तपशील झाल्यावर खालील कराराचे तपशील वाचून "मला मंजूर" या पर्यायावर क्लिक करा आणि "पुढे जा" या पर्यायावर क्लिक करा.

"मी शपथपूर्वक प्रमाणित करतो की मी वर नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार सत्य आणि अचूक आहे. मी इथे कबुल करतो की ही माहिती नंतर कधी जर चुकीची किंवा खोटी आढळली तर पुढील कायदेशीर कार्यवाही साठी मी जबाबदार आहे.

विधवा, अपंग, निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

"पुढे जा" या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल. अर्ज सबमिट झाल्यावर पुढे आपल्याला आपण निवडलेल्या योजनेनुसार आवश्यक कागदपपत्रे अपलोड करावी लागतील.

विशेष सहाय्य योजनेच्या सुधारित अटी व निकष दि. ०३/०५/२०२१ रोजीच्या नवीन शासन निर्णयात नमूद केलेल्या आहेत. यामध्ये  काही बाबी मा. लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन त्यानुषंगाने मा. मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य) यांच्या दिनांक २५ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या बैठकीत विशेष सहाय्य योजनेतील निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत सर्वकष विचार करून दिनांक २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा केल्या आहेत.

विशेष सहाय्य योजनेतील (संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेंशन योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेंशन योजना, आणि दिव्यांग पेंशन योजना ) अर्जदाराचे अर्ज तहसील/तलाठी/ग्रामपंचायत कार्यालयात ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments