महाडीबीटी (MahaDBT) शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात होणार वितरण

कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांशी निगडीत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. योजनांची अंमलबजावणी पारदर्शक रीतीने करण्याच्या दृष्टीने तसेच, राज्यात सर्व योजनांच्या अंमलबजावणीत सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने, कृषि विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे देण्याकरिता अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना “अर्ज एक-योजना अनेक" पद्धतीने विविध योजनातील सर्व बाबींसाठी एकाच अर्जाद्वारे शासनाकडे आपली इच्छुकता व्यक्त करता येते आणि अर्जातील नमूद विविध बाबी ज्या-ज्या योजनेतून देता येऊ शकतील त्या सर्व योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या अर्जास संगणकीय सोडत पद्धतीने निवड प्रक्रियेत समाविष्ट करून लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सद्य: स्थितीत, दि. ०४/११/२०२० रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कृषि विभागाच्या प्रमुख १३ योजनांची अंमलबजावणी महा-डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत असून उर्वरित योजनांचा देखील या प्रणालीवर टप्प्या-टप्प्याने समावेश करण्यात येणार आहे. 

महाडीबीटी (MahaDBT) शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात होणार वितरण

महा-डीबीटी प्रणालीवरून निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान/लाभाचे प्रदान करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने (मातं) दि.१२ ऑक्टोबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये थेट लाभ हस्तांतरण (MahaDBT) प्रणालीव्दारे निधी वितरणाची कार्यपद्धती विषद केलेली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद ८ च्या तरतूदीनुसार, “आहरण व संवितरण अधिकाऱ्याला योजनानिहाय विशिष्ट बँक खात्यामध्ये निधी प्राप्त झाल्यावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने लवकरात लवकर तो निधी मध्यवर्ती पुल खात्यावर (Central Pool Account) जमा करावयाचा आहे, जेणेकरुन अर्जदार e-voucher परत करुन त्याला अर्जाप्रमाणे लाभ/अनुदान थेटपणे त्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये प्राप्त होईल, किंवा थेटपणे प्राधिकृत संस्था/Agency यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल. कृषि विभागांतर्गत महा-डीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी तसेच, भविष्यात ज्या योजनांची महा-डीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करावयाची असेल त्या योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी कृषि आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पुल खाते (Central Pool Account) उघडण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता, त्याबाबत शासन निर्णय घेतला आहे.

महाडीबीटी (MahaDBT) शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच वितरण होणार सुरू:

१. कृषि विभागांतर्गत महा-डीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी तसेच भविष्यात ज्या योजनांची महा-डीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करावयाची असेल त्या योजनांतर्गत निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी कृषि आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पुल खाते (Central Pool Account) उघडण्यास शासन मान्यता दिली असून सदर खात्याचा वापर केवळ याच प्रयोजनासाठी करणार. 

२. शासन निर्णय दि. १३ मार्च, २०२० व दि.०३ मार्च, २०२१ अन्वये राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकांमध्ये खाती उघडण्याबाबत शासनाने सूचना निर्गमित केल्या असून कृषि आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पुल खाते उघडताना सदर सूचनांचा अवलंब करणार. 

३. महा-डीबीटी प्रणालीसाठी कृषि आयुक्तालय स्तरावर उघडण्यात येणारे मध्यवर्ती पुल खाते PFMS प्रणालीशी संलग्नीत करणार. 

४. महा-डीबीटी प्रणालीव्दारे कृषि विभागाच्या विविध योजनांचा निधी केंद्रीय पध्दतीने लाभार्थ्यांना वितरीत करण्याकरिता कोषागारातून प्रत्येक योजनेसाठी प्राप्त होणारा निधी प्रथमत: संबंधित योजनेच्या PFMS प्रणालीशी संलग्नीत बँक खात्यात जमा करणार आणि नंतर तो निधी मध्यवर्ती पुल खात्यावर (Central Pool Account) जमा करणार आणि तदनंतर कृषि आयुक्तालय स्तरावरून विविध योजनांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना केंद्रीय पद्धतीने वितरीत करणार. 

५. शासन निर्णय दि. १२ ऑक्टोंबर, २०१८ व दि. ०४ नोव्हेंबर, २०२० मध्ये नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसार, सहाय्यक संचालक (लेखा -१), कृषी आयुक्तालय, यांनी मध्यवर्ती पुल खात्यावरून विविध योजनांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वितरण करणार. 

६. कृषि आयुक्तालयाने मध्यवर्ती पुल खात्यातील व्यवहारांचे मासिक/तिमाही ताळमेळ तसेच लेखापरिक्षण करणार. 

७. सदर मध्यवर्ती पुल खाते भविष्यात बंद होईल करण्यात आल्यास, त्यामधील शिल्लक रकमेचा ताळमेळ घेऊन शिल्लक अखर्चित रक्कम योग्य त्या शासन लेखाशिर्षाखाली तात्काळ जमा करणार.

महाडीबीटी (MahaDBT) शेतकरी योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वितरणासाठी मध्यवर्ती पुल खाते उघडणेबाबतचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा - महाडीबीटी पोर्टलवर बियाणे, खते वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments