ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विकास कामांच्या ई-निविदा प्रणालीमध्ये ३ लाखांवरून १० लाख रूपयांपर्यंत वाढ

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांच्या ई-निविदेबाबत दिनांक २७ मे २०२१ रोजी नवीन शासन निर्णय घेण्यात आला.

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विकास कामांच्या ई-निविदा प्रणालीमध्ये ३ लाखांवरून १० लाख रूपयांपर्यंत वाढ

शासकीय कामे, साधन सामुग्रीची खरेदी इत्यादीमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी शासकीय खरेदी कामे इ. करिता, ई - निविदा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०६ ऑगस्ट, २०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २६ नोव्हेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये रू ३.०० लक्ष पेक्षा जास्त किंमतीच्या निविदेकरीता ई-निविदा कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार ग्राम विकास विभागाच्या दिनांक २७ मे, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या विविध विकास कामांसाठी रू.३.०० लक्ष व त्यापेक्षा अधिक निविदा मुल्यांच्या सर्व कामांसाठी ई-निविदा प्रणालीचा अवलंब करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

सामान्य प्रशासन विभागाच्या (माहिती तंत्रज्ञान) दिनांक ११ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये, ई-निविदा संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने दिलेले दिनांक ०६ ऑगस्ट, २०१०, दिनांक १९ जानेवारी २०१३ व दिनांक २६ नोव्हेंबर २०१४ चे आदेश अधिक्रमित करून यापुढे ई-निविदा संबंधी कार्यवाही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने खरेदी संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. 

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक ७ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये, रू.१०.०० लक्ष (सर्व कर अंतर्भुत करून) व त्यापुढील खरेदीसाठी ई-निविदा पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ११ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांस अनुसरून निर्णय घेण्यात आला आहे. 

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २६ नाव्हेंबर, २०१४ च्या शासन निर्णयानुसार व ग्राम विकास विभागाच्या दिनांक २७ मे, २०१५ रोजीच्या शासन निर्णयात नमुद केल्यानुसार, रू.३.०० लक्ष रकमेवरील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामे ई-निविदा पद्धतीने करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

आता या शासन निर्णयाद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांच्या रू.१०.०० लक्ष (सर्व कर अंतर्भुत करून) रकमेवरील कामांकरिता ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांच्या ई-निविदेबाबत दिनांक २७ मे २०२१ रोजीचा नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा - ग्रामीण भागातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ; पंधराव्या वित्त आयोगातील निधी आरोग्य सुविधांसाठी खर्च करण्याचा आदेश जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments