10 वी पास उमेदवारांना संधी - महाराष्ट्र पोस्टात 2428 रिक्त पदांची भरती सुरु (ग्रामीण डाक सेवक)

महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२१- ऑनलाईन नोंदणी महाराष्ट्र डाक मंडळ ग्रामीण डाक सेवक पद भरण्यासाठी 2428 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. 

10 पास उमेदवारांना संधी - महाराष्ट्र पोस्टात 2428 रिक्त पदांची भरती सुरु (ग्रामीण डाक सेवक)

भारतीय टपाल खात्याने ग्रामीण डाक सेवक भरती 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरी करण्यास इच्छुक आहात तर या भरतीसाठी अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्जांसाठी मुदत २६ मे होती, ती आता वाढवून १० जून २०२१ करण्यात आली आहे.

या भरती साठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट तयार होईल.

पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)

पद संख्या - 2428 

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र 

वयोमर्यादा - 18 ते 40 वर्षे किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयोमर्यादा. वयाची गणना २७ एप्रिल २०२१ पासून होईल.

फी - रु. 100

शैक्षणिक पात्रता: 

  1. दहावी उत्तीर्ण
  2. बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट

निवड प्रक्रिया:
  1. मेरिट यादी तयार करून निवड केली जाईल.
  2. उच्च शिक्षण योग्यता असेल तरी त्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारे प्राधान्य मिळणार नाही. अंतिम निवड ही दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच होईल.
  3. जर उमेदवाराने पाच पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केला आहे आणि मेरिटच्या आधारे त्याची एकापेक्षा अधिक पदांवर निवड झाली तर त्याची एकाच पदावर निवड होईल.

मासिक वेतन:

  1. बीपीएम पदासाठी १२ हजार ते १४,५०० रुपये
  2. जीडीएस/एबीपीएमसाठी १० हजार ते १२ हजार रुपये
महाराष्ट्र पोस्टात 2428 रिक्त पदांची भरती PDF जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

खालील लिंक वरून ऑनलाईन अर्ज करा.


वरील लिंक ओपन केल्यानंतर खालील ३ स्टेज प्रमाणे अर्ज करा.

१) सुरुवातीला उमेदवाराने नोंदणी करावी. (Registration)
२) फी भरणे (Fee Payment)
३) ऑनलाईन अर्ज करा.(Apply Online)

Steps to Apply

Post a Comment

0 Comments