पोकराचे अनुदान लवकरच होणार खात्यात जमा, महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय

सन 2021- 22 या आर्थिक वर्षात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी रु.२५० कोटी निधी वितरित करणे बाबतचा महाराष्ट्र सरकारने नवीन शासन निर्णय घेतला आहे, त्याचे अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पोकराचे अनुदान लवकरच होणार खात्यात जमा, महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय

पोकराचे अनुदान होणार खात्यात जमा, महाराष्ट्र शासनाचा निधी मंजुर (PoCRA ):

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये सहा वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रु.४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत असून गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांचेकडून निधी वितरण या बाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. सबब, प्रकल्पाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी रु.२५० कोटी एवढा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

१) सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता रु.२५० कोटी निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत असून सदर वितरित करण्यात येत असलेल्या निधीपैकी बाह्य हिश्श्याच्या व राज्य हिश्श्याच्या निधीचा तपशील खालील प्रमाणे आहे:-

पोकराचे अनुदान लवकरच होणार खात्यात जमा, महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय

२) वरील तक्त्यात नमूद केल्यानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता राज्य हिश्श्याच्या रु.७५ कोटी निधी वितरित करण्यात येत असून त्याचा बाबनिहाय तपशिल पुढील प्रमाणे:-

पोकराचे अनुदान लवकरच होणार खात्यात जमा, महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय

३) परिच्छेद क्रमांक १ येथील तक्त्यात नमूद केल्यानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता बाह्य हिश्श्याच्या रु.१७५.०० कोटी व राज्य हिश्श्याच्या रु.७५.०० कोटी निधी वितरीत करण्यात येत असून तो प्रकल्पाच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२१ -२२ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

पोकराचे अनुदान लवकरच होणार खात्यात जमा, महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय

४) सदर शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या रु.२५० कोटी निधीचे कोषागारातून आहरण व वितरणा करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेष तज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

५) प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांनी ३३-अर्थसहाय्य या उद्दिष्ट शिर्षाखाली खर्च झालेल्या रकमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करणार.

सन 2021- 22 या आर्थिक वर्षात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा साठी रु.२५० कोटी निधी वितरित करणे बाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना 

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments