कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन

रासायनिक खतांच्या वाढत्या किमती हा राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेतीसाठी खते उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलत असल्याचं भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयानं म्हटलं आहे. 

अनेक वेळा शेतकऱ्यांना कृषी केंद्र दुकानामध्ये खताचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. तसेच काही ठिकाणी खतासाठी शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे घेतले जातात. आपल्या गावा जवळच्या कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि आजचा खताचा दर केंद्र सरकारच्या अधिकृत रसायन आणि खत मंत्रालय पोर्टलवर ऑनलाईन पाहूया.

कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन

खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:

कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर ऑनलाईन पाहणीसाठी खालील केंद्र सरकारची अधिकृत रसायन आणि खत मंत्रालय पोर्टलची लिंक ओपन करा.

https://urvarak.nic.in

वरील पोर्टल लिंक ओपन झाल्यावर विविध डॅशबोर्ड दिसतील, यामध्ये आपण राज्य जिल्ह्या नुसार विविध खताचा अहवाल पाहू शकतो. आपल्याला गावातील जवळील दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पाहण्यासाठी मुख्य मेनू पर्यायांमध्ये "किसान कॉर्नर" पर्यायावर क्लीक करा.

कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन

"किसान कॉर्नर" पर्यायावर क्लीक केल्यानंतर आपल्याला इथे "राज्य", "जिल्हा" निवडून "Show" बटन वर क्लिक करा. 

जर तुम्हाला एखाद्या किरकोळ विक्रेतेचा आयडी माहिती असेल तर किंवा दुकानाचे नाव निवडून फक्त त्याच दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पाहू शकतो.

Retailer Opening Stock As On Today

"Show" बटन वर क्लिक केल्यानंतर आजचा रिटेलर ओपनिंग स्टॉक आपण पाहू शकतो, यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आणि कंपोस्ट इत्यादी खतांचा साठा आपण पाहू शकतो.

कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन

आता खताचा दर पाहण्यासाठी विक्रेत्याच्या एजन्सीच्या नावासमोर "RETAILER ID" वर क्लिक करा. "RETAILER ID" वर क्लिक केल्यानंतर तुम्ही विविध माहिती पाहू शकता, यामध्ये कृषी केंद्र दुकानाचे नाव, खताची कंपनी, खताचे नाव, खताचे दर आणि खताचा उपलब्ध साठा पाहू शकतो.

कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन


हेही वाचा - बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

वरील लेख आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments