बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट

राज्यात केाविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मागील लेखामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते सविस्तर जाणून घेतले. या लेखामध्ये आपण बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहायची? लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन, नोंदणी अपडेट कशी करायची याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट


बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस:

बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी प्रथम खालील लिंक ओपन करा. 


बांधकाम कामगार नोंदणीची वेबसाईट ओपन झाल्यावर वरती मराठी भाषा निवडा आणि वरील मुख्य मेनू मध्ये "लाभ वितरित" या पर्याया मध्ये बांधकाम कामगारांना विविध लाभ वितरित केल्याच्या याद्या आपण पाहू शकतो. 

आता आपण "कोविड-१९ मदत निधी हस्तांतरण (२ रा हप्ता)" पर्यायावर वर क्लिक करून कोविड-१९ मदत निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे लाभार्थी यादी आपण पाहूया.

बांधकाम कामगार लाभार्थी यादी अशी पहा ऑनलाईन

"कोविड-१९ मदत निधी हस्तांतरण (२ रा हप्ता)" या पर्यायावर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोविड-१९ मदत निधी हस्तांतरण २ ऱ्या हफ्त्याचा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये लाभार्थ्याचा जिल्हा, लाभार्थ्याचे नाव, लाभार्थ्याचा बँक अकाउंट नंबर किंवा बँक आयएफएससी कोड टाकून "Search" वर क्लिक करा. सर्च केल्या नंतर तुम्ही बांधकाम कामगार लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव चेक करू शकता.

बांधकाम कामगार लाभार्थी यादी अशी पहा ऑनलाईन

नोंदणीची स्थिती जाणून घ्या:

वरील बांधकाम कामगार लाभार्थी यादी मध्ये आपले नाव नसेल तर आपण आपल्या बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ऑनलाईन नोंदणी करून सुद्धा जर लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर आपण आपल्या बांधकाम कामगार नोंदणीची प्रथम ऑनलाईन स्थिती जाणून घ्या.

बांधकाम कामगार नोंदणीची स्थिती जाऊन घेण्यासाठी खालील बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन लिंक वर क्लिक करा.


बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन लिंक ओपन झाल्यावर आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून "Proceed to Form" वर क्लिक करा आणि ओटीपी टाकून बांधकाम कामगार नोंदणीची स्थिती आपल्याला दिसेल आपली नोंदणी "Active" आणि अर्ज "Accept " केला आहे का? कि "Pending किंवा NA दाखवत आहे. 

सूचना : बांधकाम कामगार लाभार्थी यादी मध्ये आपले नाव येण्यासाठी आपला अर्ज "Accept" केलेला असावा आणि नोंदणी "Active" असायला हवी.

अशी करा नोंदणी अपडेट:

आपला बांधकाम कामगार नोंदणी अर्ज Accept केला नसेल म्हणजेच Pending दाखवत असेल आणि नोंदणीची स्थिती NA दाखवत असेल तर आपली नोंदणी अद्ययावत म्हणजेच अपडेट करणे गरजेचं आहे.

नोंदणी अद्ययावत म्हणजेच अपडेट करण्यासाठी खालील बांधकाम कामगार अद्ययावत-नोंदणी लिंक वर क्लिक करा.


बांधकाम कामगार अद्ययावत-नोंदणी लिंक ओपन झाल्यावर नोंदणीच्या स्थिती मधील Acknowledgedment नंबर घेऊन आपला आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून "Proceed to Form" वर क्लिक करा.

"Proceed to Form" वर क्लिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी प्रलंबित का आहे? ते कारण दाखवले जाईल, त्यानुसार आपली नोंदणी अपडेट करावी लागेल.

संपर्क: 
दूरध्वनी क्रमांक : (022) 2657-2631
ई-मेल : info@mahabocw.in


वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

1 Comments

  1. Mohd.yunus.mohd.sofi.mobile.8888476932.majadur.nahi.mile.akola.

    ReplyDelete