महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच आतिथ्य भत्ता नियम, १९९५

आपण या लेखात ग्रामपंचायत (सरपंच) (आतिथ्य भत्ता) नियम, १९९५ विषयीची सविस्तर माहिती पाहूया. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३ याच्या कलम १७६, पोट कलम (२) खंड (पाच-अअ) व कलम ३३-अ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि त्या बाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे पुढील नियम केले आहेत. हे नियम, उक्त कलम १७६, पोट-कलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले होते.

महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच आतिथ्य भत्ता नियम, १९९५

सरपंच आतिथ्य भत्ता नियम, १९९५:

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३३-अ नुसार सरपंचाला आतिथ्य भत्ता देणे अशी तरतूद आहे. या बाबतीत राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांस अधीन राहून, दरसाल पंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या दोन टक्के किंवा सहा हजार रूपये यांपैकी जी कमी असेल तेवढी रक्कम सरपंचाकडे आतिथ्य भत्ता म्हणून सुपूर्द करण्यात येईल.

आतिथ्य भत्त्यामधून करावयाचा खर्च:

आतिथ्य भत्त्यामधून करण्यात यावयाचा कोणताही खर्च कोणत्याही वित्तीय वर्षात कलम ३३-अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पंचायतीच्या प्रत्येक वित्तीय वर्षात एकूण उत्पत्राचा दोन टक्के (जवाहर रोजगार योजना अनुदाने आणि विशेष प्रयोजनासाठी राज्य शासन, जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांच्याकडून देण्यात येणारी इतर अनुदाने वगळून) किंवा सहा हजार रूपये यापैकी जी कमी असेल त्यापेक्षा अधिक असणार नाही आणि असा भत्ता पुढील बाबीवर खर्च भागविण्यासाठी वापरण्यात येईल : 

(अ) चहा, अल्पोपाहार, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन आणि सायंकाळचा अल्पोपाहार किंवा स्नेहोपाहार.

(ब) फुले, सजावट इत्यादी. 

प्रतिष्ठित व्यक्तीचे आतिथ्य करणे:

पंचायतीकडून आतिथ्य भत्ता ज्याच्या स्वाधीन करण्यात येतो त्या सरपंचास पुढील व्यक्तीच्या अल्पोपाहारावर किंवा आतिथ्यावर खर्च करता येईल: 

(अ) भारताचे राष्ट्रपती किंवा उप-राष्ट्रपती, 

(ब) भारतातील कोणत्याही राज्याचा राज्यपालः 

(क) केन्द्रीय किंवा भारतातील कोणत्याही राज्याचा मंत्री ; 

(ड) राज्य विधानमंडळाच्या पंचायत राज समितीचे सभापती आणि सदस्य, 

(इ) शासकीय प्रयोजनासाठी पंचायतीला भेट देणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि पंचायत समितीचा सभापती

(फ) पंचायत राज्याच्या अभ्यासासाठी भारतात भेट देणारी कोणाताही विदेशी प्रतिदिन व्यक्ती, 

(ग) शासकीय प्रयोजनासाठी पंचायतीस भेट देणारा कोणताही शासकीय अधिकारी शासनाकडून वेळोवेळी विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा इतर कोणालाही प्रतिष्ठित व्यक्ती 

आतिथ्य भत्याकरिता करण्यात येणाऱ्या खर्चासाठी प्रमाणपत्र.- 

आतिथ्य भत्यामधून करण्यात येणा-या आतिथ्यावरील हिशेब सरपंचाकडून ठेवण्यात येईल आणि प्रत्येक बाबतीत, पंचायतीचा सचिव प्रत्यक्षपणे करण्यात आलेला खर्च लेखा परीक्षेच्या प्रयोजनाकरिता प्रमाणित करील आणि त्या प्रमाणपत्रात पुढील गोष्टी विनिर्दिष्ट करील 

१) आतिथ्याचे स्वरूप, 

२) प्रतिष्ठित व्यक्तीच्या आतिथ्याचा प्रवर्ग, 

३) आतिथ्य करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या, 

४) प्रत्यक्ष करण्यात आलेला खर्च.

हेही वाचा - महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य प्रवास व दैनिक भत्ते नियम १९६६

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments