वृत्त विशेषसरकारी योजना

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सुरु – नंदुरबार

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2022-2023 करीता मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मधकेंद्र योजना सुरू करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येईल व 50 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल. शासनाच्या हमी भावाने मध खरेदी करण्यासोबत मधमाशा संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण व जनजागृती मंडळामार्फत करण्यात येते.

वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षण घेणेसाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.

केंद्र चालक प्रगती‍शील मधपाळ योजनेसाठी मधपाळ संस्था, व्यक्तिंना प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जदार किमान 10 वी पास असावा आणि वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तींच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्र चालक मधपाळ प्रशिक्षण संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षांसाठी भाडे तत्वावर 1 एकर शेतजमीन असावी.प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावे.

>

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे आणि मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधीताना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला रुम नं 222, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210053) येथे संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर.एल.चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हेही वाचा – मधुमक्षिका पालन योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.