नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

भूमि अभिलेख निकाल जाहीर ! Bhumi Abhilekh Result

उपसंचालक भूमि अभिलेख, अमरावती प्रदेश, अमरावती यांच्या अधीनस्त विभागातील गट क पदसमुह ४ ( भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ कालावधीत IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे.

तसेच अमरावती, औरंगाबाद, मुंबई कोकण, नागपूर, नाशिक, आणि पुणे विभागातील जाहिरातीत नमुद पदे व सद्यस्थितीत पदभरतीकामी उपलब्ध पदांचा तपशील देखील यासोबत स्वतंत्र तक्त्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे.

खालील विभागातील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे प्रत्येक जात प्रवर्गनिहाय निवडसुची तयार करुन पुढील आठवड्यात https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच निवडसुचीसोबत पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सुचनादेखील प्रसिद्ध करण्यात येतील.

निवडसुचीत समाविष्ट उमेदवाराला त्याने परिक्षेसाठी नोंदणी अर्जात नोंदविलेल्या ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांकावर याबाबत अवगत करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

हेही वाचा – महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.