नोकरी भरतीवृत्त विशेष

मुंबई उच्च न्यायालयात ‘वाहनचालक’ पदाची भरती – Bombay High Court Recruitment 2022

उच्च न्यायालय, मुंबई मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर “वाहनचालक” या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी ४ पदे व पुढील २ वर्षात रिक्त होणारी ४ पदे, अशा एकुण ८ पदांकरीता ८ उमेदवारांची निवड यादी आणि २ उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करणेसाठी निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर निवड यादी व प्रतिक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून फक्त २ वर्षासाठीच वैध राहील. सदर पदाची वेतन मॅट्रीक्स एस- ६ : १९,९०० – ६३,२००/- व भत्ते अशी आहे. चाचणीसाठी/ मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर रहावे लागेल. नियुक्ती व अल्पसुचीचे (shortlisting) सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात ‘वाहनचालक’ पदाची भरती – Bombay High Court Recruitment 2022:

पात्रता :

१. उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
२. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
३. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान २१ वर्ष व कमाल ३८ वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही.
४.उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटर वाहन अधिनियम १९८८ (क्र. ५९/१९८८) प्रमाणे वैध व कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हींग लायसन्स) असावा.
५. उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान ३ वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा.
६. उमेदवाराचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाल (रेकॉर्ड) स्वच्छ असावा.
७. उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
८. उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना (Topography) माहित असावी.
९. उमेदवार शारीरिकदृष्टया सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
१०. चारचाकी वाहन चालविण्याचा आणि वाहनदुरूस्ती या दोन्हीचा अधिकतम अनुभव असणाऱ्या तसेच इंग्रजी भाषा किमान समजता व बोलता येणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

पात्र उमेदवारीकरीताच्या अटी :

1.तो/ती करार करणेस सक्षम असावा/असावी.
२. त्याला/तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला/तिला कोणत्याही न्यायालय/ एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.
३. त्याला/तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या/ तिच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
४. त्याने/तिने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याच्या/तिच्या उमेदवारीसाठी निवड समिती किंवा तिच्या सदस्यांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नसावा.
५.महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास, २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

एकूण जागा: 08 जागा

पदाचे नाव: वाहनचालक

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 28 मार्च 2022 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: ₹100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2022  (05:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय नौदलात खलाशी पदांच्या 2500 जागांसाठी मेगा भरती – Indian Navy Sailor Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.