वृत्त विशेष

लॉकडाऊन काळात आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू

कोविडचा प्रसार महाराष्ट्रात पुन्हा वेगाने पसरत असताना प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. दिनांक २३/०४/२०२१ रोजी शुक्रवारी राज्य पोलिसांनी आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी “अत्यंत आपत्कालीन परिस्थिती” ई-पास प्रणालीची व्यवस्था पुन्हा नव्याने सुरू केली आहे.

महाराष्ट्रचे पोलिस महासंचालक DGP संजय पांडे म्हणाले आहेत कि, ‘आज शुक्रवारपासून ई-पास सिस्टमची नव्याने रचना करण्यात आली आहे, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी नागरिकांनी त्याचा वापर करावा. लोकांना https://covid19.mhpolice.in/ वर यासाठी अर्ज करावा लागेल. आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. आणि त्यांच्या अत्यंत आपत्कालीन प्रवास करावा लागत आहे त्या प्रवासाचे योग्य ते कारण तिथे नमूद करावे लागेल’.

ज्यांना ऑनलाईन ई-पास सिस्टमचा प्रवेश नाही, ते मिळविण्यासाठी तुम्ही जवळच्या पोलिस ठाण्याला भेट देऊ शकता. पोलिस ठाण्याचे कर्मचारी तुम्हाला तो फॉर्म भरण्यास आणि ई-पास काढून देण्यास मदत करतील. अशी पूर्ण माहिती त्यांनी लॉकडाऊन च्या काळात प्रवास करणाऱ्या जनतेला सांगितली. तसेच हि सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे

ई-पास कसा काढायचा?

ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा “Apply For Pass Here” या बटनावर क्लिक करा.

लॉकडाऊन काळात आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू

पुढे नोटिफिकेशन येईल त्यामध्ये महाराष्ट्राबाहेर जायचं आहे की नाही त्यानुसार सिलेक्ट करून “Submit” बटन वर क्लिक करा.

लॉकडाऊन काळात आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू
पुढे ई-पास साठी खालील माहिती भरायची आहे.

जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा.

तुमचे संपूर्ण नाव नोंद करा.

प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा.

मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा.

वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.

प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा.

आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा.

परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा.

200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

संबंधित कागदपत्र जोडा:

वैध संस्थेचे दस्तऐवज / वैद्यकीय अहवाल / कंपनी आयडी / आधार कार्ड इ.

डॉक्टर प्रमाणपत्र / योग्यता प्रमाणपत्र जोडा.

सूचना : प्रत्येक कागदपत्राच्या फाईलची साईझ 1 MB च्या वर नसावी.

अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला टोकन आयडी मिळेल. टोकन क्रमांक सेव्ह करुन ठेवा. ई-पास अर्ज मंजूर झाल्यानंतर टोकन आयडीद्वारे नोट करुन ठेवा.

ई-पास डाऊनलोड कसा कराल?

ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर टोकन क्रमांक नोंदवून ई-पास पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करा. आणि प्रिंट आऊट काढून ठेवा.

https://covid19.mhpolice.in/status

ई-पास डिजीटल आणि प्रिंट स्वरुपात प्रवासादरम्यान सोबत ठेवा. ईपासचा गैरवापर करणे कायद्याप्रमाणं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.