शेतकऱ्यांना मिळणार 30 हजार रुपये प्रती एकर – सौर कृषी वाहिनी योजनेचा असा करा ऑनलाईन अर्ज

2030 पर्यंत संपूर्ण स्थापित वीज निर्मिती क्षमतेत अक्षय ऊर्जेचा वाटा 40% पर्यंत वाढवण्याच्या भारताच्या प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून, भारत सरकारने देशात सौर आणि इतर नूतनीकरणक्षम उर्जा प्रकल्पांच्या विकासास प्रोत्साहित व सक्षम केले आहे.

सौर कृषी वाहिनी योजनेची उद्दिष्टे:

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणे हे मुख्य उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून शासनातर्फे महावितरण द्वारे सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर प्रकल्प उभारुन त्या भागातील कृषी वाहिन्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचे प्रयोजन केले आहे.
या योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्रांच्या 5 किमी च्या आत 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करुन कृषी वाहिनी वर दिवसा वीज देणे योजिले आहे. महावितरण कंपनीने प्रस्तावित सौर प्रकल्पांच्या क्षमतेनुसार 33/11 के.व्ही. उपकेंद्रांची यादी उपल्ब्ध करुन दिली आहे. या योजनेला गतीमान करण्याकरिता व शेतक-यांकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीचा उपयोग करुन त्यांना लाभ पोहचविण्याकरिता भाडेतत्वावर जमिन घेण्याचे योजिले आहे.
सदर जमीन शासकीय असल्यास शासन निर्णयानुसार नाममात्र रु.1/- च्या भाडेपट्टीवर 30 वर्षांसाठी घेण्यात येईल व खाजगी जमिनी रु.30,000/- प्रती एकर (प्रती वर्ष 3% वाढ) या दराने भाडे तत्वावर घेण्यात येतील.
सौर कृषी वाहिनी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:
खालील महावितरणच्या अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करा.

https://mskvy.mahadiscom.in/MSKVYSolar/

महावितरणची वेबसाईट ओपन झाल्यावर “Click Here for New User Registration” या ऑप्शन वर क्लिक करा आणि युजर आयडी बनवा.

आता एक नवीन वापरकर्ता नोंदणी फॉर्म येईल, कृपया खाते तयार करण्यासाठी हा फॉर्म भरा.

तुमच्या मोबाइलवर ओटीपी प्राप्त केल्यानंतर कृपया ओटीपी सबमिट करा

प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृपया “Create Account” वर क्लिक करा

तुम्ही नवीन वापरकर्ता नोंदणी फॉर्म भरताना जो युजरनेम पासवर्ड सेट केला त्याने लॉगिन करा. लॉगिन झाल्यावर “Land & Developer” पर्यायामध्ये “Registration for Land Lease” या पर्यायावर क्लिक करा.

जमीन भाडेपट्टीसाठी उप-स्टेशन यादी:

सूचना 1: आपल्या जमिनीसाठी जिल्हा व तालुका वार सबस्टेशन यादी शोधा.

सूचना २: भूसंपादनासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या जमीनीपासून K कि.मी. अंतरावर सबस्टेशन क्रमांकावर क्लिक करा.

सूचना 1: आपल्या जमिनीसाठी जिल्हा व तालुका वार सबस्टेशन यादी शोधा. सूचना २: भूसंपादनासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या जमीनीपासून K कि.मी. अंतरावर सबस्टेशन क्रमांकावर क्लिक करा.

जमीन तपशील नोंदणी अर्ज:

आता आपण जमीन तपशील नोंदणी अर्जामध्ये खालील माहिती भरा.
अर्जदाराचा तपशील
पत्रव्यवहारासाठी पत्ता
जमीन तपशील
बँक खाते तपशील

तसेच खालील कागदपत्रे अपलोड करा आणि अप्लिकेशन सबमिट करा.

7/12 निर्देशांक अर्क
आधार कार्ड प्रत
बँक रद्द चेक / पासबुक प्रत
अधिकृत पत्र
8-अ उतारा
उत्परिवर्तन प्रविष्टी (फेरफर उतारा)
जमीन तपशील नोंदणी अर्ज

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.