वृत्त विशेषनोकरी भरतीमहसूल व वन विभागस्पर्धा परीक्षा

वनविभागातील भरतीबाबत सद्यस्थिती – Forest Department Recruitment Status

वनविभागातील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक २७/१२/२०२२ (संदर्भ ३) अन्वये निर्गमित केलेल्या आहेत. तसेच वनरक्षक भरतीबाबत वेगळ्याने कार्यपध्दती महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक २७/१२/२०२२ ( संदर्भ ४) अन्वये ठरवून दिली आहे.

सरळसेवेने भरती करावयाच्या पदांच्या सेवाप्रवेश नियमासंदर्भात या कार्यालयाकडून शासनास संद्रम करण्यात आला होता. त्या अनुषंगाने शासनाने पत्र दिनांक ३१/०१/२०२३ अन्वये (अत संलग्न) एकूण २८ संवर्गाचे बाबतीत मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या आहे. त्यानुसार अनुक्रमांक १ ते १९ नुसार खालीलप्रमाणे कळविले आहे.

अ. क्रपदनामदिनांक ३१/१/२०२३ चे शासन पत्रान्वये प्राप्त सुचनेनुसार करावयाची कार्यवाही
1लघुलेखक उच्चश्रेणी अ. रा. गट-बसर्व संवर्गाच्या बिंदुनामावली प्रमाणित, टीसीएस कंपनीसोबत करार झाल्यानंतर जाहीरात प्रसिध्दीबाबत कार्यवाही करण्यात यावी.
2लघुलेखक निम्नश्रेणी अ. रा. गट-ब
3वरिष्ठ सांख्यिक सहायक गट-क
4कनिष्ठ सांख्यिकी सहायक गट-क
5लेखापाल गट क
6शिपाई गट-ड
7वनरक्षक गट-कमा. राज्यपाल यांच्या दिनांक २९/८/२०१९ च्या अधिसुचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक व सर्व्हेक्षक पदे भरण्यासंदर्भात धोरणात्मक प्रस्ताव विचाराधिन असल्याने तुर्तास अनुसूचित क्षेत्रातील पदे वगळता इतर ठिकाणची पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना शासनाने दिनांक ३१/३/२०२३ अन्वये दिल्या आहेत. [ तथापी आता सा.प्र.वि. शासन निर्णय दि. १/२/२०२३ अन्वये मा. राज्यपाल महोदयांच्या दि. २९/८/२०१९ चै अधिसूचनेचे अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) मधील १७ संवर्गातील पदांच्या भरतीबाबत सविस्तर सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी. ]
8सर्वेक्षक गट-क
9कनिष्ठ अभियंता गट ब अराजपत्रितयापूर्वी या संवर्गाची भरती सा.बा.चि.च्या दिनांक ५/१/१९९८ च्या सेवाप्रवेश नियमानुसार करण्यात आलेली आहे, त्यामुळे सदर सेवाप्रवेश नियमाच्या आधारे भरतीप्रक्रिया राबविण्यात यावी.
10ट्रक चालक गट-कसा. प्र. विभागाच्या दिनाक २/३/२०१७ रोजीच्या सेवाप्रवेश नियमानुसार भरतीप्रक्रिया राबविण्यात यावी, तथापी उमेदवाराने जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना सुध्दा धारण करणे अनिवार्य करण्यात यावे.
11गृह प्रमुख गट-कया संवर्गाची भरती प्रक्रिया आतापर्यंत ज्या आधारे केली जात आहे, त्या आधारे राबविण्यात यावी.
12लाँच चालक गट-क
13ग्रंथालय परिचर गट-क
14पशु परिचर गट-क
15खलाशी गट
16पहारेकरी गट ड
17सहायक स्वयंपाकी गट-ड
18चेनमन गट-ड
19नोका तांडेल गट-ड

या व्यतिरिक्त माहुत. चाराकटर शारीरिक प्रशिक्षण ड्रील शिक्षक बिनतारी संदेश चालक, बिनतारी तंत्रज्ञ, ताल, कवायत शिक्षक, मास्क लश्कर व देखभाल सेवक या सवर्गाचे सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविणेबाबत शासनाने पत्र दिनांक ३१/०१/२०२३ अन्वये कळविले आहे.

सा.प्र.वि. शासन निर्णय दि. १ / २ / २०२३ अन्वये मा. राज्यपाल महोदयांच्या दि. २९/८/२०१९ अधिसूचनेचे अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) मधील १७ संवर्गातील पदांच्या भरतीबाबत सविस्तर सुचना निर्गमित केलेल्या आहेत.

वनविभागातील एकूण पदांपैकी गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड मधील कोणत्या पदाची भरती कोणती समिती करेल, याबाबत सविस्तर यादी महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक २७ / १२ / २०२२ (संदर्भ ३) मध्ये नमुद केली आहे. सदर शासन निर्णय, शासन पत्र दिनांक ३१/१/२०२३ व सा.प्र.वि. शासन निर्णय दिनांक १/ २ / २०२३ मधील सुचना यांचा एकत्रित विचार करून भरती प्रक्रियेबाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहे..

अ. क्रसमितीसमितीकडून भरण्यात येणारी पदेकरावयाची कार्यवाही
1जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खालील जिल्हास्तरीय समितीगट-क गृहप्रमुख, माहूत, लीच चालक, ट्रक चालक. कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर गट-ड शिपाई, चैनमॅन, चारा कापणारा, खलाशी, नौका तांडेल, मॉश्क लश्कर, तांडेल, पहारेकरी, देखभाल सेवक व सहाय्यक स्वयंपाकीगट-क मधील ट्रक चालक, गृहप्रमुख, लाँच चालक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर व गट-ड मधील शिपाई, खलाशी, पहारेकरी. सहाय्यक स्वयंपाकी चैनमॅन, नौका तांडेल या पदांबाबत शासन पत्र दिनांक ३१/१/२०२३ मधील सुचनांनुसार भरती प्रक्रिया राबवावी व प्रचलित सामाजिक च समांतर आरक्षण विचारात घेऊन मागणीपत्र तात्काळ जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावे व तसे या कार्यालयास अवगत करावे. ही कार्यवाही ६/२/२०२३ पर्यंत पूर्ण करावी. गट-क मधील माहूत, कवायत शिक्षक व गट-ड मधील चारा कापणारा लश्कर तांडेल देखभाल सेवक या पदांची भरती प्रक्रिया ही सदर संवर्गाचे सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध झाल्यानंतर राबवावी.
2मुख्य वनसंरक्षक (प्रा.) वनसंरक्षक (प्रा.) यांचे अध्यक्षतेखालील प्रादेशिक निवड समितीगट-क लेखापाल, सर्वेक्षक, शारीरिक प्रशिक्षण ड्रील शिक्षक, वन निरिक्षक बिनतारी संदेश चालक व बिनतारी तंत्रज्ञ, वनरक्षकशारीरिक प्रशिक्षण ड्रील शिक्षक, बिनतारी संदेश चालक व बिनतारी तंत्रज्ञ या पदांची भरती प्रक्रिया ही सदर संवर्गाचे सेवाप्रवेश नियम प्रसिद्ध झाल्यानंतर राबवावी. वन निरिक्षक हे पद संपुष्टात आले असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया राबविणेची आवश्यकता नाही. सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ५/२/२०२३ मध्ये सर्व्हेक्षक हे पद वनविभागाशी निगडीत दर्शविलेले नाही. त्यामुळे मा. राज्यपाल यांची दि. २९/८/२०१९ ची अधिसूचना वनविभागातील सर्वेक्षकास लागू आहे किंवा कसे, याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येत आहे. शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर सर्व्हेक्षक पदाबाबत आपणास कळविण्यात येईल. सा.प्र. दि. शासन निर्णय दि. १/२/२०२३ मधील तरतूदीनुसार वनरक्षकांची अनुसूचित क्षेत्रातील पदे व बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे निश्चित करण्यात यावीत व त्यानुसार बिंदुनामावली प्रमाणित करुन घेऊन पदांचे मागणीपत्र सोबतचे विवरणपत्रात वनविभागनिहाय या कार्यालयास सादर करावे. तसेच सर्व वनविभाग मिळून वनवृत्ताचा एकत्रित गोषवारा सादर करावा. लेखापाल पदाचे मागणीपत्र या कार्यालयाने पत्र क्र. २९१ दिनांक १/२/२०२३ अन्वये ठरवून दिलेल्या विवरणपत्रात कार्यालयास सादर करावा,

वनविभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-ड या संवर्गातील भरतीबाबत पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती – India Post Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.