कृषी योजनामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजनासहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ५०,०००/ लाभ योजनेचा निधी वितरीत !

सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०२२ – २३ या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत दिनांक २९.०७.२०२२ अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) (२४३५ ०१८९), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत सन २०२२- २३ या आर्थिक वर्षासाठी रु.४७००.०० कोटीच्या पुरवणी मागणीच्या प्रस्तावास वित्त विभागाच्या दिनांक २९.०८.२०२२ तसेच सहकार विभागाच्या  ४, दिनांक ३०.०८.२०२२ च्या शा. नि. अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी रु. २३५०.०० कोटी इतकी रक्कम दिनांक १६.०९.२०२२ रोजीच्या शा. नि. अन्वये रु. ६५०.०० कोटी इतकी रक्कम दिनांक १८.१०.२०२२ रोजीच्या शा.नि. अन्वये तसेच रु. ७००.०० कोटी इतकी रक्कम दिनांक १७.०१.२०२३ रोजीच्या शा. नि. अन्वये वितरीत करण्यात आली आहे. सद्यस्थितीत उर्वरीत रक्कम रु. १०००.०० कोटी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ५०,०००/ लाभ योजनेचा निधी वितरीत !:-

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. १०००.०० कोटी (रु. हजार कोटी फक्त) इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) (२४३५ ०१८९), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सदर खर्च मागणी क्रमांक व्ही – ०२, २४३५ – इतर कृषीविषयक कार्यक्रम ६० – इतर १०१ शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, (००) (०४) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) (२४३५ ०१८९), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन २०२२-२३ या वित्तीय वर्षांअंतर्गत उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून करण्यात यावा.

सदर तरतूद खर्च करण्यासाठी (Vo००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. सदर निधी आहरण करुन हा खर्च वेळेत होईल याची सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दक्षता घ्यावी. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी.

सदर शासन निर्णय, नियोजन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक १९/१४३१ दिनांक २७.०१.२०२३ अन्वये तसेच वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ५४/२०२३ /व्यय-२, दिनांक ०६.०२.२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय (07-02-2023): महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना तिसरी लाभार्थी यादी जाहीर ! – Mahatma Jyotiba Phule Karj Mafi – MJPSKY 3rd List

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ५०,०००/ लाभ योजनेचा निधी वितरीत !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.