वृत्त विशेष

माल वाहतुकीसाठी असा काढा ई-पास (Goods Transport RTO E-Pass)

शेती मालाची वाहतूक, तसेच अन्य जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीसाठी परिवहन विभागाने ई-पास देण्याची योजना सुरू केली आहे. ही परवानगी ऑनलाइन देण्यात येत आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यातून जीवनावश्यक वस्तू वगळल्या आहेत. त्यानुसार, कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही वाहतूकदारांना अडचण येऊ नये यासाठी ई-पास सुविधा देण्यात आली आहे.

माल वाहतुकीसाठी ई-पास कसा काढायचा?

ई-पास काढण्यासाठी https://transport.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. परिवहन विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर “ePass For Goods Vehicle” या पर्यायामध्ये “Apply For e-Pass for Goods Vechicle” या पर्यायावर क्लिक करा.

आता माल वाहतुकीसाठीचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये खालील आवश्यक माहिती भरा.

यामध्ये तुमचे प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ ऑफिस निवडा.

या पर्यायामध्ये गाडीच्या मालकाचे आणि ड्रायव्हरचे खालील तपशील भरा.

वाहन मालकाचे नाव
वाहन चालकाचे नाव
चालकाचा परवाना क्रमांक
मोबाइल नंबर
ई – मेल आयडी

Vehicle Details:

या पर्यायामध्ये वाहनाचा खालील तपशील भरायचा आहे.
वाहन क्रमांक
चेसिस क्रमांकाचे शेवटचे 5 अंक
वाहनांचा प्रकार
माल वाहतुकीसाठी असा काढा ई-पास (Goods Transport RTO E-Pass)

Transportation Details:

या पर्यायामध्ये खालील वाहतुकीचा तपशील भरायचा आहे.
वस्तूंचे स्वरूप
ऑपरेशनचे क्षेत्र (महाराष्ट्रात)
पासचा कालावधी
माल वाहतुकीसाठी असा काढा ई-पास (Goods Transport RTO E-Pass)

वरील सर्व माहिती भरून झाल्यावर “Word verification” म्हणजेच कॅप्चा कोड टाकून फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यावर पोच पावती मिळेल ती PDF फाईल डाउनलोड करा.

आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी पुन्हा https://transport.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. परिवहन विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर “ePass For Goods Vehicle” या पर्यायामध्ये “Check Status of Your ePass Application” या पर्यायावर क्लिक करा आणि अर्जाचा रेफरन्स नंबर टाकून स्टेटस चेक करा.

ई-पास डिजीटल आणि प्रिंट स्वरुपात माल वाहतुक करताना सोबत ठेवा. ईपासचा गैरवापर करणे कायद्याप्रमाणं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.