वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी व शहरी भागातील 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी शासन निर्णय जारी

मा.मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनच्या अनुषंगाने शिफारशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत टास्क फोर्स नियुक्त करण्यात आलेला आहे. सदर टास्क फोर्ससोबत दि. २४.८.२०२१ रोजी झालेल्या चर्चेच्या वेळी टास्क फोर्सने शाळा सुरु करण्यासंदर्भात काही शिफारशी/सूचना केल्या आहेत.

शासन परिपत्रक दिनांक ७ जुलै, २०२१ व दिनांक १० ऑगस्ट, २०२१ नुसार देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांसह सदर परिपत्रकात नमुद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग दि. ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी पासून सुरू करण्यास सदर परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात येत आहे.

अतिरिक्त मार्गदर्शक सूचना –

अ) प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरु करणे:

  • शक्य असल्यास क्लिनिक सुरु करावे.
  • विद्यार्थ्यांचे नियमितपणे टेम्परेचर तपासावे.
  • शक्य असल्यास यासाठी इच्छूक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी.
  • सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.
  • हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व परीचारीकांची मदत घ्यावी.
  • उपरोक्त कामासाठी CR किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा.

ब ) शाळेत येताना घ्यावयाची काळजी :

  • मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.
  • ज्या शाळांमध्ये स्कूलबस / खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी.
  • विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक/ वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे.

क) शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना:

  • जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना दयाव्यात.
  • विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबत निर्देश दयावेत, जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.
  • वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करुन घ्यावा.

ड) खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन :

  • सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येवू नयेत.
  • कोरोना विषयक परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नाही. तथापि असे खेळ घेत असताना खालीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी.
  • खेळाचे साहित्य नियमित सॅनिटाईज करावे.
  • खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्याकडे शिक्षकांनी लक्ष दयावे, विशेषतः थकलेल्या व दमलेल्या विद्यार्थ्याकडे लक्ष असावे.
  • विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावा व त्यांच्यामध्ये २ मीटरचे अंतर असावे.
  • जवळचे संबंध येणारे खेळ जसे, खो-खो, कबड्डी इत्यादी टाळावे. क्रिकेट, शारीरिक शिक्षण अशाप्रकारचे खेळ/कार्य करण्यास हरकत नाही.

इ) आजारी विद्यार्थी शोधणे :

  • ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छवास करणारे, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले, ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे सुजलेले, उलटया – जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावे.

फ) विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे- खालील लक्षणे दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी.

  • जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोटयाशा गोष्टीने निराश होणारे,.
  • वर्गात नेहमी शांत बसणारे व कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे.
  • वयाशी विसंगत वर्तणूक दर्शविणारे उदा. अंगठा चोखणे इ.
  • खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शविणारे.
  • शालेय शिक्षणात असामान्य घट दर्शविणारे,
  • असहाय्य झालेले व सतत रडणारे विद्यार्थी.
  • अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी व त्याच्याशी संवाद साधावा.

ग) विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन:

  • पहिल्या १ ते २ आठवडयामध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांस शाळेची सवय होवू दयावी.
  • प्रत्येक विद्यार्थ्याची पार्श्वभूमी अवगत करुन त्यानुसार विद्यार्थ्यांशी परस्पर संवाद साधावा.
  • कोविड होवून गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे वागावे,
  • विद्यार्थी व पालकांशी ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने संपर्कात राहणे.

ह) शिक्षक – पालक बैठकीत चर्चा:

  • कोविड आजाराबाबत माहिती व सदर आजार टाळण्याबाबत माहिती देणे,
  • पालकांच्या प्रश्नांना योग्य संवादाने उत्तर दयावे,
  • पालकांनी पुरेसे मास्क तयार करणे व सदर मास्क दररोज धुणे,
  • मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पध्दतीने पालकांनी लक्ष ठेवण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करणे.
  • लवकर उठून शाळेच्या वेळेत मुलांना तयार करणे,
  • मुलांना कमीत कमी पुस्तके/वहया न्याव्या लागतील अशी व्यवस्था असावी.

ज ) घरात प्रवेश करताना घ्यावयाची काळजी :

  • घरात आल्यानंतर थेट स्नानगृहामध्ये जाणे, स्नान करुन युनिफॉर्म बदलणे,
  • आंघोळीनंतर युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावा किंवा संबंधित शाळेने विद्यार्थ्यांना युनिफॉर्म ऐच्छिक करावा.
  • मास्कसुध्दा साबणाच्या पाण्याने धुवून बाहेर वाळत ठेवावा,
  • पालकांनी मुलांना शाळेचे उपक्रमाबाबत अवगत करुन त्यांना पुढील दिवसासाठी तयार करावे.

ल) सीएसआर निधीचा उपयोग करणेबाबत:

  • शाळांना फॅन, सॅनिटायझर या गोष्टी सीएसआर निधीमधून उपलब्ध करुन घेण्यास हरकत नसावी,
  • वैद्यकीय उपकरणे जसे, ऑक्सीमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, औषधे, मास्क इ. सीएसआर मधून उपलब्ध करुन घेण्यास हरकत नसावी.

वरील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन देखिल करण्यात यावे.

शासन निर्णय : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – दहावी-बारावी मार्च 2022 च्या थेट खाजगी परिक्षेसाठी १७ नंबर फॉर्मची ऑनलाईन नोंदणी सुरु (10th-12th Online Registration of Form No. 17)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.