नोकरी भरतीवृत्त विशेष

राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत शासन निर्णय जारी

राज्यातील नागरी सहकारी बँकांचे कामकाज कार्यक्षम व निर्विवाद पध्दतीने हाताळण्यासाठी गुणवत्तापूर्ण सेवक वर्गाची पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासन आदेश क्र. युआरबी १८१८/प्र.क्र. ९/ शिकाना/७ – स, दि. २१ जानेवारी, २०१९ अन्वये राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांना ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रीया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या शासन आदेशान्वये करण्यात येत असलेल्या नोकर भरतीमध्ये काही अडचणी येत असल्याने मा. मंत्री (सहकार) यांच्या निर्देशानुसार संदर्भाधीन शासन आदेशामध्ये सुधारणा करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या संदर्भाधीन क्र.२ मधील आदेशान्वये अपर निबंधक (प्रशासन) यांचे अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर समितीने खालील शासन आदेशातील  संदर्भाधीन क्र. ३ अन्वये सादर केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने खालील शासन आदेशातील अ.क्र. १ नंतर परिच्छेद १ (अ) समाविष्ट करण्यात येत आहेत.

नोकरभरतीसाठी मार्गदर्शक सूचना :

>

i) स्टाफींग पॅटर्नला संबंधित नागरी सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक राहील.

ii) २० पेक्षा अधिक पदे भरावयाची असल्यास संबंधीत नागरी सहकारी बँकेने ऑनलाईन पद्धतीने भरती करणे आवश्यक राहील.

iii ) २० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नोकरभरती करताना रिझर्व्ह बँकेने स्टाफींग पॅटर्नबाबत वेळोवेळी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र संबंधीत नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक राहील. तद्नंतर आवश्यकता असल्यास निबंधकाने याबाबतची तपासणी करुन खात्री करावी.

iv. नागरी सहकारी बँकांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत सहकार आयुक्त कार्यालयाने तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमीत कराव्यात.

v) सदर ऑनलाईन नोकरभरती मधून चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी उदा. शिपाई, वॉचमन, वाहन चालक, तसेच वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापक/ शाखा व्यवस्थापक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना वगळण्यात येत आहे.

vi) तांत्रिक अधिकाऱ्यांसदर्भात ऑनलाईन नोकरभरतीची आवश्यकता नाही .

vii) ऑनलाईन नोकरभरतीसाठी अधिकृत एजन्सीचे राज्यस्तरीय पॅनेल सहकार आयुक्तांनी तयार करावे. (यात नागरी सहकारी बैंक फेडरेशन, राज्य सहकारी बैंक असोसिएशन तथा जिल्हा सहकारी बँक असोसिएशन्स यांना प्राधान्य देण्यात यावे.) तथापि नागरी सहकारी बँक फेडरेशनकडे सदर ऑनलाईन नोकरभरतीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ, तंत्रज्ञान व सामग्री असणे आवश्यक आहे.

viii) मौखिक परिक्षेसाठी लेखी परिक्षेच्या गुणांच्या जास्तीत जास्त १०% मर्यादेत गुण ठेवण्यात यावेत.

ix) संबंधीत नागरी सहकारी बँकांचे संचालक व त्यांचे नातेवाईक यांना नोकरभरती प्रक्रीयेत सहभागी होता येणार नाही.

x)  २० पेक्षा कमी पदे भरावयाची असल्यास संबंधीत नागरी सहकारी बँकेने सहकार आयुक्तांनी तयार केलेल्या अधिकृत एजन्सी पॅनेलमधील संस्थेकडूनच निःपक्ष व पारदर्शक पद्धताने परीक्षा घेऊनच नोकरभरती करावी.

खालील शासन आदेशातील संदर्भाधीनअ.क्र. २ मधील अनुक्रमांक) मधील शेवटच्या ओळीनंतर खालील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे. ” अथवा किमान पाच व्यापारी बँका (राष्ट्रीयकृत बँका/खाजगी बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका)/नागरी सहकारी बँका/शासनातील विविध विभागांसाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नोकर भरतीचा अनुभव असणाऱ्या नामांकीत संस्थांना प्राधान्य देण्यात यावे. “वरील प्रमाणे करण्यात आलेल्या सुधारणांव्यतिरिक्त शासन आदेश क्रमांक: युआरबी १८१८/प्र.क्र.९/शिकाना/७- स, दि. २१ जानेवारी, २०१९ मधील आदेश कायम आहेत.

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग शासन निर्णय:

राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत दि. २९.११.२०२१ रोजीचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

हेही वाचा – बॅंक, रेल्वे, एलआयसी, पोलिस, सैन्य भरती ई. स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.