वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

बारावीच्या निकालावर आक्षेप असल्यास, असा करा तक्रार अर्ज (HSC Result Objection Complaint Form 2021)

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार जाहीर केलेल्या निकालाबाबत आक्षेप असल्यास विद्यार्थ्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत तक्रार निवारण अधिकारी तथा विभागीय सहसचिव यांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक व ई – मेल आयडी दिले आहेत.

कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थिती विचारात घेऊन सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा दि.११ जून, २०२१ च्या शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली. तद्नंतर दि.०२ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन त्यांना गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्यासाठी सुधारित मूल्यमापन कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मंडळामार्फत सदर मूल्यमापन कार्यपध्दतीच्या अमंलबजावणीबाबत तपशिलवार परिपत्रक, परिशिष्टे तयार करुन दि. ०५/०७/२०२१ च्या पत्राद्वारे सर्व विभागीय मंडळे व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांना पाठविण्यात आली व त्यानुसार निकालाची कार्यवाही करण्यात आली आहे.

तथापि, मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ च्या संदर्भात रिट याचिका क्र.६२०/२०२१ दाखल करण्यात आलेली आहे. सदर याचिकेबाबत मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दि.२४/०६/२०२१ रोजीच्या निकालानुसार सदर परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार जाहीर झाल्यानंतर सदर निकालावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्याच्या निराकरणासाठी मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याबाबत आदेशित केलेले आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इ.१२ वी परीक्षेचा सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना सदर निकालावर काही आक्षेप/तक्रारी असतील तर त्या नोंदविण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी मंडळामार्फत संबंधित विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासाठी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव हे काम पाहतील.

सदर तक्रार निवारण अधिकारी तथा विभागीय सहसचिव यांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी खालीलप्रमाणे आहेत:

तक्रार निवारण अधिकारी

तक्रार अर्ज PDF फाईल:(HSC Result Objection Complaint Form 2021)

संबंधित विद्यार्थी यासंदर्भातील आपला तक्रार अर्ज टपाल/ई-मेल/व्यक्तिशः उपरोक्त तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे सादर करु शकतील. यासाठी मंडळामार्फत विहित करण्यात आलेल्या (प्रपत्र-अ) नमून्यात विद्यार्थ्यास अर्ज करावा लागेल. सदर अर्जाचा नमूना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

तक्रार निवारण अधिकारी, कार्यालयीन कामाच्या १० दिवसात सदर अर्ज निकाली काढून विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने परिपूर्ण वस्तुस्थिती पत्र/ई-मेलद्वारे अवगत करतील. विद्यार्थ्यास सदर उत्तराच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास संबंधित विभागीय मंडळातील विभागीय सचिव/ विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा. तरी याबाबतची सर्व प्राचार्य, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व इतर सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.

हेही वाचा – बारावीचा निकाल आज ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर (HSC Result 2021)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.