नोकरी भरतीमहानगरपालिकावृत्त विशेष

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (ANM) सहाय्यक परिचारिका प्रसाविका पदाची भरती – KDMC Recruitment 2022

कल्याण डोबिवली महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत खालील संवर्गातील ३४ रिक्त पदांकरीता करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (ANM) सहाय्यक परिचारिका प्रसाविका पदाची भरती – KDMC Recruitment 2022:

अटी व शर्ती:-

(१) सोबतच्या नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज आणि खालील कागदपत्रांसह उमेदवाराने थेट मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. (पासपोर्ट साईज २ फोटो, फोटो आयडी मतदान ओळखपत्र/आधारकार्ड इत्यादी जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व मार्कशिट (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका आवश्यक आहे.) अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, मुलाखतीच्या अनुषंगाने इतर कागदपत्र यांच्या मुळ व सत्यप्रत साक्षांकित प्रती). कोणत्याही सबबीवर मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच मुलाखतीवेळी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र खोटे/चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल. तसेच अर्ज दाखल करण्यास/मुलाखतीस उपस्थित राहिल्याबद्दल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्रवासभाडे अथवा भत्ता देय राहणार नाही.

>

(२) निवड होणाऱ्या उमेदवारांना आदेशाच्या तारखे पासून २९ जुन २०२२ पर्यंत नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर १२ महिन्याकरीता करारपध्दतीने पुर्ननियुक्ती देण्यात येईल सदरहू पदे निव्वळ कंत्राटी पध्दतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरावयाची असून प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील. तसेच नियुक्तीच्या कालावधीमध्ये उमेदवारांचे काम समाधानकारक न आढळल्यास तसेच कोणत्याही स्वरुपाची गैरवर्तणूक केल्यास कोणतेही कारण न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल.

(३) मागासवर्गीय संवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या पदावर इतर संवर्गातील उमेदवाराची निवड करण्यात येईल.

(४) एएनएम पदांची वयोमर्यादा ६५ वर्ष राहील.

(५) सदरहू पदे एनयुएचएम अंतर्गत असल्याने त्यांचा कल्याण डोंबिवली महापालिका आस्थापनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. तसेच निवड होणाऱ्या उमेदवारास कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील कोणत्याही पदावर हक्क सांगणेकामी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.

(६) शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असणारा अनुभव असणारे पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशासकीय, खाजगी संस्थांचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल.

(७) उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.

(८) निवड/नियुक्ती संदर्भात अंतिम अधिकार अध्यक्ष तथा आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना राहतील आणि निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार त्यांनी राखून ठेवले आहे.

(९) आरक्षण स्थितीमधे काही बदल असल्यास त्यामधे बदल करण्याचे आणि अधिकार अध्यक्ष तथा आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना राहतील.

एकूण जागा: 34 जागा

पदाचे नाव: सहाय्यक परिचारिका प्रसाविका

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ANM कोर्स

वयाची अट: 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: कल्याण-डोंबिवली

फी : फी नाही.

अर्ज स्विकारण्याची तारीख: 11 एप्रिल 2022 (09:00 AM पासून)

थेट मुलाखत: 11 एप्रिल 2022 (10:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज (Application Form): अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय करिअर सेवा : 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा ! – National Career Service

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.