नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र कृषी विभागात भरती – Krushi Recruitment 2023

राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांवरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

महाराष्ट्र कृषी विभागात भरती – Krushi Recruitment 2023:

कृषी व पदुम विभागातील कृषि आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक ( उच्च श्रेणी) रिक्त पदे भरण्यासाठी रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

एकूण जागा : 218 जागा (158+60)

1) विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन – २०२३:

एकूण : 158 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ लिपिक105
2सहाय्यक अधीक्षक53
एकूण 158

विभागीय तपशील: 

अ. क्र.विभाग  पद संख्या
वरिष्ठ लिपिकसहाय्यक अधीक्षक
1औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)1104
2पुणे1305
3ठाणे1808
4नाशिक1206
5कोल्हापूर1404
6नागपूर1410
7अमरावती0910
8 लातूर1406
एकूण 10553
एकूण जागा 158
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य)  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी : अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]

2) कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या राज्यस्तरीय संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात सन २०२३:

एकूण जागा : 60 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लघुटंकलेखक28
2लघुलेखक (निम्न श्रेणी)29
3लघुलेखक (उच्च श्रेणी)03
एकूण 60

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी : अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांसाठी भरती – SSC CGL Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.