‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा (Ladki Bahin Yojana First installment) लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, दिनांक 14 ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांनासुद्धा दि. 17 ऑगस्टपर्यत हा लाभ मिळणार आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दिनांक 14 ऑगस्टपर्यत 1 कोटी 62 लाखापेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे.
खालील लाडकी बहीण योजनेच्या संबंधित महत्वपूर्ण लेख वाचा !
- लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये आले नाही तर हे काम करा !
- मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा दाखल करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया !
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस!
- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; असा भरा वेबपोर्टल वरून ऑनलाईन अर्ज !
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय :
- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण – CM Majhi Ladki Bahin Yojana योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – Post Zero Balance Account : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोस्टात झिरो बॅलन्स मध्ये खाते उघडण्याचे आवाहन !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!