नोकरी भरतीवृत्त विशेष

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा २०२१ – Maharashtra MahaRojgar Melava

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने 12 ते 17 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळावा २०२१ घेण्यात येणार आहे. या मेळाव्याद्वारे नोकरी इच्छुक युवक-युवतींसाठी राज्यभरातील रोजगारांची संधी मिळणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग, व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. आता राज्यातील बहुतांश उद्योग व व्यवसाय पुर्ववत कार्यरत झालेले आहे.

राज्यातील या रोजगार मेळाव्यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अल्पसंख्याक व विकासमंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार महारोजगार मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. विविध क्षेत्रातील ३० हजार रिक्त पदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.

ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा रोजगार मेळावा असणार आहे. उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती पाहून आवश्‍यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता उमेदवारांना घ्यावी लागणार आहे.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. शक्‍य तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा २०२१ – Maharashtra Rojgar Melava:

रोजगार मेळाव्याचा प्रकार: खाजगी रोजगार मेळावा.

विभाग : मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, आणि  पुणे.

जिल्हा: नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, रायगड, पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, आणि पालघर.

एकूण जागा: 30,000+ जागा

पदाचे नाव: सेल्स मार्केटिंग, सेल्सट्रेनी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, डाटा एन्ट्री ऑपरेटर ITI फिटर आणि  इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: दहावी/बारावी/ITI/पदवीधर/D.Ed./D.T.Ed/इंजिनिरिंग डिप्लोमा.

मेळाव्याची तारीख: 12 ते 17 डिसेंबर 2021

मेळाव्याचे ठिकाण: ऑनलाईन

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती – MAHA Bhulekh Recruitment 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

4 thoughts on “राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा २०२१ – Maharashtra MahaRojgar Melava

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.