राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती – Maharashtra State Excise department Recruitment

विभागातील जवान व जवान-नि-वाहनचालक पदांसाठी संबंधित सेवाप्रवेश नियम दि. ०१.०१.१९९३ मध्ये शारिरीक पात्रतेचे निकष विहीत करण्यात आले आहेत. साहजिकच पदभरती करण्यापूर्वी उमेदवारांची शारिरीक चाचणीच्या अनुषंगाने पडताळणी करणे क्रमप्राप्त आहे. जवान व जवान नि वाहनचालक या पदांच्या शारिरीक पडताळणीसोबतच उमेदवारांची शारिरीक चाचणी/मैदानी परिक्षा घेणे आवश्यक आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवारांच्या शारिरीक चाचणीमध्ये एकसूत्रता आणणे, शारिरीक चाचणीची मार्गदर्शक तत्वे विहीत करणे. पदभरतीप्रक्रियेची अभ्यासक्रमासह रुपरेषा ठरविणे व त्यात एकसूत्रता तथा पारदर्शकता आणणे या सर्व बाबी विचारात घेवून जवान व जवान नि वाहनचालक पदावर निवड प्रक्रिया राबविताना संबंधित उमेदवारांची शारिरीक पात्रता पडताळणी पुढीलप्रमाणे नियमित करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती – Maharashtra State Excise department Recruitment:

जवान व जवान आणि वाहनचालक पदांसाठी संबंधित सेवाप्रवेश नियम दि.०१.०१.१९९३ मध्ये वय, शैक्षणिक अर्हतेचे व शारिरीक पात्रतेचे निकष विहीत करण्यात आले आहेत. जवान व जवान-नि-वाहनचालक पदांवरील नियुक्तीसाठी वयाची, शैक्षणिक व इतर अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड समितीद्वारे खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून निवडसूची बनवण्यात येईल.

परीक्षेचा टप्पा :

अ.क्र. पदनाम परिक्षेचे टप्पा गुण एकूण
जवान व जवान नि वाहनचालक १. लेखी परिक्षा २. शारिरिक चाचणी / मैदानी परीक्षा १२० २००
२. शारिरिक चाचणी / मैदानी परीक्षा ८०
फक्त जवान-नि-वाहनचालक करिता विशेष प्राविण्य चाचणी
१. हलके मोटार वाहन चालविणे
२. जड मोटार वाहन चालविणे
सदर चाचणी ही फक्त जवान नि वाहनचालक या पदाच्या उमेदवारांची घेण्यात यावी.
चपराशी १. लेखी परिक्षा २००

नकारात्मक गुणदान

१. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील.

२. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.

३. वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही तो अपूर्णाकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.

४. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

अभ्यासक्रम :-

पदनाम विषय दर्जा माध्यम प्रश्न संख्या गुण कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप 
जवान व जवान नि वाहनचालक बुध्दीमापन चाचणी माध्यमिक शालांत (S.S.C.) मराठी व इंग्रजी ३० ३० १ तास ३० मिनीटे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
सामान्य ज्ञान ३० ३०
मराठी मराठी ३० ३०
इंग्रजी इंग्रजी ३० ३०
एकूण १२० १२०
चपराशी बुध्दीमापन चाचणी माध्यमिक शालांत (S.S.C.) मराठी व इंग्रजी ५० ५० २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
सामान्य ज्ञान ५० ५०
मराठी मराठी ५० ५०
इंग्रजी इंग्रजी ५० ५०
एकूण २०० २००

उक्त नमुद विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.

अ.क्र. विषय घटक व उपघटक
बुध्दिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.
सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास,महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, नागरीकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी
मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नाची उत्तरे
4 इंग्रजी Common vocabulary, Sentence structure, Grammar. Use of Idioms & Phrases and their meaning and Comprehension of passage

जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान ४५% गुण मिळवून लेखी परीक्षा उतीर्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीतील प्रवर्ग निहाय नमुद केलेल्या पद संख्येच्या १:१० या कमाल प्रमाणात प्रवर्ग निहाय उमेदवारास शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.

७. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रनिमा १२१६ / प्र.क्र.६५/ १३-अ, दि.१३.०६.२०१८ मधील अनुक्रमांक २ नुसार निवड समित्यांची स्थापना करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पुढील सदस्यांचा समावेश करून सदर जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात येईल.

१. जिल्हाधिकारी – अध्यक्ष

२. मुख्य कार्यकारी अधिकारी – सदस्य

३. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी – सदस्य

४. जिल्हा समाजकल्याण अधिकारी – सदस्य

५. जिल्हा आदिवासी विकास अधिकारी – सदस्य

६. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी – सदस्य

७. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, (गट अ) – सदस्य

८. शारिरीक पात्रता पडताळणी :- (केवळ जवान व जवान-नि-वाहनचालक पदांसाठी)

पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी
उंची किमान १६५ से.मी. किमान १६० से.मी.
छाती न फुगविता ७९ से.मी. (किमान ) व फुगवून छातीतील किमान प्रसरण ५ से.मी. आवश्यक लागू नाही
वजन लागू नाही ५० कि.ग्रॅ.

जे उमेदवार सेवाप्रवेश नियमातील तरतूदीनुसार शारिरीक अहर्तेत पात्र ठरतील त्याच उमेदवारांची शक्यतत्याच दिवशी मैदानी चाचणी घेण्यात येईल. शारिरीक पडताळणीच्या वेळी उक्त नमुद निवड समितीच्या सदस्यांपैकी किमान चार सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शारिरीक पडताळणीच्या निष्कर्षाबाबत उमेदवाराचा आक्षेप असल्यास सदर उमेदवारांना शारिरीक तपासणीच्या फेरपडताळणीसाठी प्रत्यक्ष शारिरीक पडताळणी कार्यक्रमाची व्हिडीओ फोटोग्राफी करण्यात यावी.

शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी खालीलप्रमाणे घेण्यात येईल.

अ.क्र. पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी
मैदानी चाचणीचा प्रकार गुण मैदानी चाचणीचा प्रकार गुण
१.५ किमी धावणे ३० १ किमी धावणे ३०
१०० मी. धावणे ३० १०० मी. धावणे ३०
गोळा फेक २० गोळा फेक २०
एकूण ८० एकूण ८०

वरीलप्रमाणे मैदानी चाचणी ८० गुणांची असून त्यांचे गुण विभाजन मैदानी प्रकारानुसार खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

१. पुरुष उमेदवारांसाठी :-

अ) १.५ कि.मी. धावणे (३० गुण)

कालावधी (मिनिटांमध्ये) ३० पैकी गुण
५ मि. ३० सेकंद व त्यापेक्षा कमी ३०
५ मि. ३१ सेकंद ते ५ मि. ४५ सेकंद २८
५ मि. ४६ सेकंद ते ६ मि. ०० सेकंद २५
६ मि. ०१ सेकंद ते ६ मि. १५ सेकंद २०
६ मि. १६ सेकंद ते ६ मि. ३० सेकंद १५
६ मि. ३१ सेकंद ते ७ मि. १०
७.मि. ०१ संकद पेक्षा जास्त

ब) १०० मीटर धावणे (३० गुण)

कालावधी (मिनिटांमध्ये) ३० पैकी गुण
११.५ सेकंद व त्यापेक्षा कमी ३०
११.५१ सेकंद ते १२.५ सेकंद २८
१२.५१ सेकंद ते १३.५ सेकंद २५
१३.५१ सेकंद ते १४.५ सेकंद २०
१४.५१ सेकंद ते १५.५ सेकंद १५
१५.५१ सेकंद ते १६.५ सेकंद १०
१६.५१ सेकंद व त्यापेक्षा जास्त

क) गोळा फेक (गोळा वजन ७.२६० कि. ग्रॅ.) (२० गुण)

अंतर (मीटरमध्ये) २० पैकी गुण
८.५० मीटर व त्यापेक्षा जास्त २०
७.९० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ८.५० मीटर पेक्षा कमी १८
७.३० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ७.९० मीटर पेक्षा कमी १६
६.७० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ७.९० मीटर पेक्षा कमी १३
६.१० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ६.७० मीटर पेक्षा कमी १०
५.५० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ६.१० मीटर पेक्षा कमी
४.९० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ५.५० मीटर पेक्षा कमी
४.३० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ४.९० मीटर पेक्षा कमी
३.७० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ४.३० मीटर पेक्षा कमी
३.७० मीटर पेक्षा कमी

२. महिला उमेदवारांसाठी

अ) १ कि.मी. धावणे (३० गुण)

कालावधी (मिनिटांमध्ये) ३० पैकी गुण
४ मि. व त्यापेक्षा कमी ३०
४ मि. ०१ सेकंद ते ४ मि. १५ सेकंद २८
४ मि. १६ सेकंद ते ४ मि. ३० सेकंद २५
४ मि. ३१ सेकंद ते ४ मि. ४५ सेकंद २०
४ मि. ४६ सेकंद ते ५ मि. १५
५ मि. ०१ सेकंद ते ५ मि. १५ सेकंद १०
५ मि. १६ सेकंद पेक्षा जास्त

ब) १०० मीटर धावणे (३० गुण)

कालावधी (मिनिटांमध्ये) ३० पैकी गुण
१४ सेकंद व त्यापेक्षा कमी ३०
१४.०१ संकंद ते १५ सेकंद २८
१५.०१ सेकंद ते १६ सेकंद २५
१६.०१ सेकंद ते १७ सेकंद २०
१७.०१ सेकंद ते १८ सेकंद १५
१८.०१ सेकंद ते २० सेकंद १०
२०.०१ सेकंद पेक्षा जास्त

क) गोळा फेक (गोळा वजन – ४ कि.ग्रॅ.) (२० गुण) 

अंतर (मीटरमध्ये) २० पैकी गुण
६ मीटर व त्यापेक्षा जास्त २०
५.५० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ६ मीटर पेक्षा कमी १६
५ मीटर व त्यापेक्षा जास्त ते ५.५० मीटर पेक्षा कमी १२
४.५० मीटर व त्यापेक्षा जास्त ते ५ मीटर पेक्षा कमी
४.५० मीटर पेक्षा कमी

वर नमुद केल्यानुसार जवान व जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या पदाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेतील गुण आणि शारिरीक पात्रता पडताळणी अंती मैदानी चाचणीचे गुण यांची एकत्रित बेरीज करून त्याआधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी.

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रनिमा १२१६ / प्र.क्र.६५/१३-अ, दि.१३.०६.२०१८ मधील अनुक्रमांक १२ नुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्ग निहाय नमुद केलेल्या पद संख्येच्या प्रमाणात उमेदवारांची गुणवत्ता क्रमानुसार उमेदवारांची प्रवर्ग निहाय निवड सूची तयार करण्यात येईल. अतिरीक्त उमेदवारांच्या संख्येची परिगणना करताना उमेदवारांची संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील पूर्णांक संख्या विचारात घेण्यात यावी.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधीग्राह्य राहील. त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल. सदर निवडसूचीमधुन गुणवत्ताक्रमानुसार नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहीत मुदतीत रुजू न झाल्यास किंवा त्याचा चारित्र्य पडताळणी अहवाल प्रतिकूल आढळून आल्यास किंवा तो वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळाने प्रमाणपत्र सादर करण्यास अपात्र ठरल्यास संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील किंवा शासन नियमातील अन्य तरतुदींनुसार पात्र नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेल्या उमेदवाराने रुजू झाल्यानंतर नजिकच्या कालावधीत राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास, अशी पदे त्या त्या प्रवर्गाच्या निवडसूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात यावीत. मात्र अशी कार्यवाही निवडसूचीच्या कालमर्यादेत करण्यात यावी. तसेच भविष्यात किंवा भरतीप्रक्रियेदरम्यान सामान्य प्रशासन विभागाने भरतीप्रक्रिया, निवडसूचीच्या अनुषंगाने दिलेल्या सुचना किंवा सुधारणा लागू राहतील.

हेही वाचा – भारतीय रिझर्व्ह बँकेत वाहनचालक पदाची भरती – RBI Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.