नोकरी भरतीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ – Maharashtra ZP Recruitment 2023

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वित्त विभागाच्या दिनांक ०४ मे, २०२० च्या शासन निर्णयान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता अन्य विभागातील पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते.

सामान्य प्रशासन विभागाने दि. ४ मे २०२२ च्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या पदभरतीबाबत दि. १० मे २०२२ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली होती.

जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित पदे वगळता इतर संवर्गातील पदांबाबत वित्त विभागाच्या दि. ३० सप्टेंबर, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार विभागाचा सुधारित आकृतिबंध अंतिम होऊन त्यास शासनाची मान्यता मिळाल्याशिवाय पदभरती करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. आता वित्त विभागाच्या दि. ३१ ऑक्टोबर, २०२२ च्या शासन निर्णयानुसार ज्या विभाग / कार्यालयांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग/ कार्यालयांतील गट-अ, गट-ब व गट-क मधील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे. सदर सूचनांस अनुसरून ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेच्या गट-क संवर्गाची (वाहनचालक ब गट-ड संवर्गातील पदे वगळूना पदभरती करण्याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ – Maharashtra ZP Recruitment 2023:

>

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाच्या (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) पदभरतीबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

१. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.

२. जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक निश्चित करण्यात येवून प्रपत्र- १ मध्ये जोडण्यात आले आहे. सदर कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व जिल्हा परिषदांनी तंतोतंत पालन करावे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन / ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.

अ.क्र. कार्यक्रम कालावधी दिनांक
1 बिंदू नामावली अंतिम करणे, रिक्त पदांची (एकूण रिक्त पदांच्या ८०% पदे) संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती करणे, कंपनीची निवड करणे आवश्यक असल्यास) व तदनुषंगिक सर्व कामे करणे २.५ महिने ३१ जानेवारी, २०२३ पर्यंत.
2 पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे ०१ आठवडा ०१ ते ०७ फेब्रुवारी, २०२३
3 उमेदवारांचे अर्ज मागविणे १५ दिवस ०८ ते २२ फेब्रुवारी, २०२३
4 उमेदवारी अर्जांची छाननी ०१ आठवडा २३ फेब्रुवारी ते ०१ मार्च, २०२३
5 पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे ०४ दिवस ०२ ते ०५ मार्च, २०२३
6 जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने/मंडळाने प्रत्यक्ष परिक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे ०१ महिना ०६ मार्च, २०२३ ते ०५ एप्रिल २०२३
7 पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देणे ०१ आठवडा ०६ ते १३ एप्रिल २०२३
8 परिक्षेचे आयोजन (ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने १७ दिवस १४ ते ३० एप्रिल २०२३
9 अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे ०१ महिना ०१ ते ३१ मे २०२३

ग्राम विकास विभाग शासन निर्णय: जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे भरण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर २०२२-२०२३ – Health Department Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.