नोकरी भरतीवृत्त विशेषसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

विद्युत सहाय्यक पदाची सुधारीत निवड यादी व सुधारीत प्रतिक्षा यादी जाहीर – Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Result

महावितरण कंपनीमध्ये “विद्युत सहाय्यक” या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरीता जाहिरात क्र. ०४/२०१९ ही माहे जुलै, २०१९ मध्ये प्रसिध्द करण्यात आलेली होती. “विद्युत सहाय्यक’ पदाची सुधारीत निवड यादी व सुधारीत प्रतिक्षा यादी दि. २७/१०/२०२२ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २९-३० ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे. सबब, उमेदवारांनी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये दि. २९-३० ऑक्टोबर २०२२ रोजी कागदपत्रांची पडताळणीकरिता उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

विद्युत सहाय्यक पदाची सुधारीत निवड यादी व सुधारीत प्रतिक्षा यादी – Mahavitaran Vidyut Sahayak Bharti Result:

१. महावितरण कंपनीमध्ये “विद्युत सहाय्यक” या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता तीन वर्षाच्या निश्चित कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्याकरिता जाहिरात क्र. ०४/२०१९ ही माहे जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

२. मा. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० प्रकरणी दि. ०५/०५/२०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. ०५/०७/२०२१ अन्वये भरती प्रक्रिया राबविण्या संदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ई.डब्ल्यू.एस. प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गाचा निकाल दि. ०१/१०/२०२१ रोजी प्रसिद करण्यात आला होता. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये दि. २१-२२ / १० / २०२१ रोजी पूर्ण करण्यात येऊन नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली.

३. सदर पदाची प्रतिक्षा यादी ई.डब्ल्यू.एस. प्रवर्ग वगळून दि. ०२/०२/२०२२ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती व सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद नोंदी अर्हता संबंधिताच्या प्रमाणपत्रांची पडताळणी दि. ०३-०४ मार्च २०२२ रोजी करण्यात आली आहे.

४. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. २६६३/२०२१ संदर्भात मा. न्यायालयाने दि. २९/०७/२०२२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार व मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका क्र. २००५/२०२२ यामध्ये दिलेल्या आदेशानुसार “विद्युत सहाय्यक पदाची सुधारीत निवड यादी तसेच मा. महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार “विद्युत सहाय्यक’ पदाची समांतर आरक्षणासहीत सुधारीत प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

५. मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दि. २९/०७/२०२२ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारीत निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडळनिहाय यादी सोबत जोडलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमुद नोंदी/अर्हता संबधीतांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी दि. २९/१०/२०२२ ते दि. ३०/१०/२०२२ रोजी करण्यात येणार आहे.

६. सोबत जोडण्यात आलेल्या परिमंडळनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये उमेदवारांनी उपरोक्त नमूद कालावधीत कागदपत्र पडताळणीकरिता स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य राहील. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरीता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

७. ऑनलाईन अर्जामध्ये नोंदविलेल्या नोंदीसंबंधी दस्तऐवज दाखले छानणीकरीता सादर करणे सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची आहे. ऑनलाईन अर्जामधील व जाहिरातीमधील अर्हतेबाबत नमूद केलेली कागदपत्रे ज्या दिवशी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, त्या दिवशी उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत तर त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल आणि त्यास उमेदवार सर्वस्वी जबाबदार राहील,

८. निवड झालेल्या उमेदवारांना नेमणुकी करिता हक्क म्हणून सांगता येणार नाही. उमेदवाराची निवड ही जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्हता, अटी व शर्तीच्या अधीन राहून तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या प्रचलित नियमानुसार “तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.

९. कागदपत्रे पडताळणी दिवशी जे उमेदवार उपस्थित असतील, अशा उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी लगत पुढील दिवशी करण्यात येईल.

१०. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी स्वः खर्चाने यावे लागेल आणि त्यांना कोणताही प्रवास खर्च भत्ता दिला जाणार नाही.

११. सदर भरती प्रक्रिया ही मा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिका (डायरी नं) २१९७४ / २०२२ व यासंदर्भात विविध न्यायालयात असलेली प्रलंबित याचिका, औद्योगिक कामगार न्यायालय, ठाणे, याचिका क्र.४८/२०१२. मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका क्र. २००५ / २०२२, ६४९६/२०१९ व संलग्न याचिका तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठामध्ये दाखल झालेल्या याचिका क्र. ५४२/२०१८, क्र. ७०३८/२०१८ क्र. ५३१०/२०१९ व इतर अन्य मुद्यांच्या संदर्भात विविध न्यायालयात / न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णय तसेच अन्य मुद्दांच्या संदर्भात विविध न्यायालयात न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील आदेशाच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या तसेच शासन निर्णयात उद्भवणान्या भविष्यातील न्यायालयीन प्रकरणांच्या अधीन राहुन करण्यात येत आहे.

निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शविल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत केलेले छायांकीत प्रतीं सहीत कागदपत्रे तपासणीसाठी हजर रहावे :

i) सिस्टीम जनरेटेड अॅप्लीकेशन ऑनलाईन फॉर्म (ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध करुन देण्यात येईल.)

ii) एस.एस.सी. (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा) गुणपत्रक व प्रमाणपत्र.

iii) आय. टी. आय. प्रमाणपत्र (Electrician/Wireman) / सेंटर ऑफ एक्सलन्स (Electrical Sector ) प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी.

iv) जातीचे प्रमाणपत्र ( II Applicable)

४) जातीचे वैधता प्रमाणपत्र (वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जाती वैधताबाबतची सोबत जोडलेल्या यादीतील नमूद केलेले कागदपत्रे सादर करावी. (If Applicable)

vi) समांतर आरक्षणाच्या पृष्टयर्थं सक्षम प्राधिकान्याकडून विहित केलेले प्रमाणपत्र उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद ऑनलाईन अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

vii) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

viii) सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र

ix) ऑनलाईन अर्जामधील व जाहिरातीमधील अर्हतेबाबत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे.

हेही वाचा – GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती – SSC GD Constable Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.