नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया-2022-23 – MFS Admission 2022

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमी, अग्निशमन आणि उप अधिकारी अभ्यासक्रम वर्ष 2022-23. महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश.

महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया-2022-23 – MFS Admission 2022:

एकूण जागा: 70 जागा

>

उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स):

अ. क्र. कोर्सचे नाव पद संख्या
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स 30
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40
एकूण जागा 70

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: 45%गुण]
  2. पद क्र.2: 50% गुणांसह पदवीधर    [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC: 45%गुण]

शारीरिक पात्रता:

उंची  वजन  छाती 
अग्निशामक (फायरमन) पुरुष 165 सें.मी. 50 kg 81/ 86  सें.मी
महिला 157 सें.मी. 46 kg —-
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी पुरुष 165 सें.मी. 50 kg 81/ 86  सें.मी

वयाची अट:  [SC/ST/NT/VJNT/SBC: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
  2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे

फी (प्रवेशअर्ज): 

  1. अग्निशामक (फायरमन): General: ₹500/-   [SC/ST/ VJ/VJNT/SBC/OBC :₹400/-]
  2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: General: ₹600/-   [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC: ₹450/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2022 (11:59 PM)

पाठयक्रम:

१. अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम (पुरुष व महिला उमेदवारांकरीता ३० महिला उमेदवार उपलब्ध झाल्यास हा पाठयक्रम आयोजित करण्यांत येईल).

२. उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम (फक्त पुरुष उमेदवारांकरीता पाठयक्रमाची क्षमता ४०)

प्रशिक्षण तरुण व होतकरू तरुण/तरुणी उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक/अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र पाठयक्रम दरवर्षी आयोजित करतात. अग्निशामक पाठयक्रम (कालावधी ०६ महिने) व अधिकारी पाठयक्रम (कालावधी ०१ वर्ष हे दोन्ही पाठयक्रम निवासी असून या पाठयक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टीकोनातून हे पाठयक्रम आयोजित करण्यांत येतात.

अग्निशमन सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टीप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक/अधिकारी यांची मोठया प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात. जरी हे क्षेत्र तरुण तडफदार युवकासाठी असले तरी प्रथमच तरुण युवतींसाठी पाठयक्रम आयोजित करण्यात येत आहे. जर ३० महिला उमेदवार उपलब्ध झाल्यास हा त्यांचेसाठी अग्निशामक पाठयक्रम आयोजित करण्यांत येईल.

प्रवेशासाठी पात्रता :

खाली नमूद केल्याव्यतिरिक्त अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे व त्यास मराठी भाषा येणे गरजेचे आहे. सदर बाब शैक्षणिक व कागदपत्रांची पडताळणीच्या वेळी बघितली जाईल).

अटी/शर्ती अग्निशामक पाठयक्रम उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक
अधिकारी पाठयक्रम
वय १८ ते २३ वर्षे ( ऑनलाईन अर्ज भरण्याच्या
प्रथम दिवशी उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण
पाहिजेत). (अनुसूचित जाती/(अनुसूचित
जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष
मागास प्रवर्गाकरीता ५ वर्षे शिथिल व इतर
मागासवर्गीय/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी
०३ वर्षे शिथिल)
१८ ते २५ वर्षे (ऑनलाईन अर्ज
भरण्याच्या प्रथम दिवशी उमेदवाराचे
वय १८ वर्षे पूर्ण पाहिजेत). अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती/ विमुक्त जाती/भटक्या
जमाती/विशेष मागास प्रवर्गाकरीता ५ वर्षे
शिथिल व इतर मागासवर्गीय/ईडब्ल्यूएस
उमेदवारांसाठी ०३ वर्षे शिथिल)
शैक्षणिक पात्रता पुरुष उमेदवारांसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून
मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या
प्रयत्नात किमान एस.एस.सी. उत्तीर्ण (५० टक्के
खुल्या प्रवर्गासाठी व ४५ टक्के (अनुसूचित जाती/
अनुसूचित जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/
विशेष मागास प्रवर्ग/इतर मागास प्रवर्ग/एसईबीसी/
ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांकरीता)महिला उमेदवारांसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी
विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान एस.एस.सी. उत्तीर्ण
मान्यताप्राप्त विदयापीठातून पदवी उत्तीर्ण
(५० टक्के खुल्या प्रवर्गासाठी व ४५ टक्के
(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/विमुक्त
जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग/
इतर मागास प्रवर्ग/एसईबीसी/ईडब्ल्यूएस
प्रवर्गातील उमेदवारांकरीता )
शारीरिक पात्रता  उंची १६५ सें.मी. (किमान) पुरुष उमेदवारांसाठी
१५७ से.मी. (किमान) महिला उमेदवारांसाठी
वजन ५० किलो (किमान) पुरष उमेदवारांसाठी
४६ किलो (किमान) महिला उमेदवारांसाठी
छाती फक्त पुरुष उमेदवारांसाठी
८१ सें.मी. (सर्वसाधारण)
८६ सें.मी. (फुगवून)
(किमान ०५ से.मी. छाती फुगविणे आवश्यक आहे).
उंची १६५ सें.मी. (किमान) पुरुष उमेदवारांसाठी
वजन ५० किलो (किमान) पुरष उमेदवारांसाठी
छाती ८१ सें.मी. (सर्वसाधारण)
८६ सें.मी. (फुगवून)
(किमान ०५ से.मी. छाती फुगविणे आवश्यक आहे).अटी/शर्ती

वरील नमूद केलेल्या अटी/शर्ती व्यतिरिक्त खालील दर्शविल्याप्रमाणे वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.

वैद्यकीय मापदंड:

१. डोळे : अर्जदार डोळयांनी रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी ६/६ असणे आवश्यक आहे.

२. कोणत्याही प्रकारचे कान, नाक व घसाचे आजार नसणे. व्यवस्थित ऐकू येणे. या व्यतिरिक्त अर्जदार खाली दिलेल्या आजारातून मुक्त असणे गरजेचे आहे.

१. हाडांचा किंवा सांध्याचा आजार
२. पूर्व मानसिक आजार
३. त्वचेचा आजार
४. सपाट पाय किंवा गुडघे टेकलेले
५. रक्त वाहिनी फूगणे
६. तिरकस डोळे
७. कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंगत्व नसावे.
८. मोठया प्रमाणात शस्त्रकिंया झालेली नसावी
९. ऐकू न येणे किंवा बोलतांना अडथळणे (बोबडेपणा)
१०. कोणत्याही प्रकारचे अपंगत्व, जेणेकरुन अग्निशमन किंवा विमोचन कार्य करतांना त्रास होऊ शकतो.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची कार्यपध्दती व सूचना :

इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन दि. १०.०६.२०२२ ते दि. ३१.०७.२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणे.

संकेतस्थळ : https://mahafireservice.formsubmit.in/ep_ses_web_landing 

ऑनलाईन अर्ज भरताना महत्वाच्या सूचना

१. जाहिरात व्यवस्थित वाचणे

२. ज्या पाठयक्रमासाठी अर्ज करणार आहात त्या पाठयक्रमाच्या अटी व शर्ती व्यवस्थित तपासून घेणे.

३. फॉर्म भरण्याआधी User ID व Password तयार करणे व फॉर्म भरताना व पुढील कोणतीही प्रक्रिया करताना त्याचा वापर करणे.

४. अंतिम दिनांकाच्या अगोदर पूर्ण अर्ज शुल्कासह भरणे. भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.

५. आपण तयार केलेले User ID व Password ने नमूद केलल्या संकेस्थळावर प्रवेशासाठी अर्ज (Fill Application Form) या शीर्षकाखाली फॉर्म पूर्णपणे भरुन झाल्यावर त्याची प्रिंट काढून स्वतःकडे एक प्रिंट ठेवणे (सदर अर्जाची प्रिंट शेक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी बघितली जाईल) अर्ज भरताना खालील नमूद केलेली माहिती योग्य रितीने भरणे.

अ. स्वतःबददल पूर्ण माहिती (Personal Information)
ब.शैक्षणिक माहिती (Educational Details)
क. वैदयकीय माहिती (Medical Information)
ड. इतर माहिती (Other Information)
इ. ईमेल आयडी
ई. मोबाईल नं.

छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती.

१. अपलोड करावयाचे छायाचित्र उंची व रुंदी प्रत्येकी २०० pixel असलेले असणे आवश्यक आहे, तसेच छायाचित्राचे आकारमान ३ KB ते ५० KB च्या दरम्यान असावे.

२. उमेदवाराने स्कॅन स्वाक्षरी सादर करणेसाठी को-या कागदावर ५ x ४.५ सेमी आकाराचा एक आयत काढा व त्या आयतामध्ये उमेदवाराने स्वतः काळया शाईच्या पेनने स्वाक्षरी करन ती प्रतिमा स्कॅन करावी. स्वाक्षरीच्या प्रतिमेची उंची ६० पिक्सल आणि रुंदी १४० पिक्सल असावी आणि प्रतिमेचा आकारमान ३ KB ते ५० KB च्या दरम्यान असावी.

६. जो पर्यंत पूर्ण माहिती भरली जात नाही व नमूद केलेली प्रवेश शुल्क भरले जात नाही तो पर्यंत ऑनलाईन प्रवेश फॉर्म पूर्ण भरलेली आहे असे गृहीत धरला जाणार नाही.

७. वर नमूद केलेल्या संकेतस्थळांवर जाऊन वेळोवेळी अर्जाची व परीक्षेची स्थिती तपासणे. परीक्षेच्या काही दिवस अगोदर प्रवेश पत्र उपलब्ध होईल. कोणत्याही प्रकारचे लेखी स्वरुपात कळविले जाणार नाही याची नोंद घ्यावी. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी दि.१२.०९.२०२२ पासून पुढे व ऑनलाईन परीक्षेची तारीख शारीरिक पात्रता पडताळणीनंतर कळविण्यांत येईल.

८. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी ही महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, हंस भुग्रा मार्ग, विदयानगरी, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०० ०९८ येथे घेण्यात येईल तर ऑनलाईन परीक्षा आपण निवडलेल्या परीक्षा केंद्रात घेण्यात येतील.

परिक्षा शुल्क भरणा (ना परतावा)

वर्ग अग्निशामक पाठयक्रम उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम
खुला रु.५००/- रु.६००/-
राखीव(अनु.जाती जमाती विमुक्त
जाती व भटक्या जमाती/विशेष
मागास प्रवर्ग व इतर मागास
प्रवर्ग/एसईबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्ग)
रु .४००/- रु.४५०/-

अ. परीक्षा शुल्काचा भरणा हा फक्त Online पध्दतीनेच करावयाचा आहे. या नमूद केल्याप्रमाणे Online पध्दती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पध्दतीने भरणा केलेले परीक्षा शुल्क हे विचारात घेतले जाणार नाही.

उमेदवाराने दोन्ही पाठयक्रमासाठी अर्ज केला असल्यास विहित केल्याप्रमाणे प्रत्येक पाठयक्रमासाठी त्याने परीक्षा शुल्क एकाच वेळी भरणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार ! – गृहविभागाची अधिसूचना जारी

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.