राज्यात ५०,००० जागांसाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ पदांची मेगा भरती !
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५०,००० योजनादूत (Yojana Doot Bharti) नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योजनादूत (Yojana Doot Bharti) कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच, योजनादूतांच्या (Yojana Doot Bharti) निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे.
राज्यात ५०,००० जागांसाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ पदांची मेगा भरती – Mukhyamantri Yojana Doot Bharti :
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी ५०,००० योजनादूत (Yojana Doot Bharti) निवडण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम” सुरु.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री (Yojana Doot Bharti) योजनादूत नेमले जातील. याबाबतची कार्यपध्दती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल.
एकूण : ५०,००० जागा.
पदाचे नाव आणि तपशील :
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचविणे याकरीता “मुख्यमंत्री योजनादूत (Yojana Doot Bharti)” थेट ग्रामस्तरापर्यंत नेमले जाणार.
पद क्र. | विभाग | विभागानुसार पदसंख्या | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ग्रामीण विभाग | राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी – १ | योजनादूत | ५०,००० |
शहरी विभाग | ५००० हजार लोकसंख्येसाठी – १ | |||
एकूण | ५०,००० |
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर, संगणक ज्ञान आवश्यक.
वयाची अट : १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
मानधन : १०,००० रुपये प्रती महिना (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
पात्रतेचे निकष :
१) उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
२) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक.
३) उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
आवश्यक कागदपत्रेः
१) विहित नमुन्यातील “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
२) आधारकार्ड.
३) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
४) अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
५) वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल.
६) पासपोर्ट साईज फोटो.
७) हमीपत्र. (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रियाः
१) उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्यसंस्थांमार्फत ऑनलाईनरीत्या पूर्ण करण्यात येईल.
२) सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल.
३) ऑनलाईनरीत्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने, प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील). त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर ६ महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही.
४) जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन (Orientation) करतील.
५) जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहायक आयुक्त, (कौशल्य विकास रोजगार) व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ / शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील.
६) मुख्यमंत्री योजनादूत (Yojana Doot Bharti) या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब, या नेमणूकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे.
निवड झालेल्या योजनादूताने करावयाची कामे:
१) योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील.
२) प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील.
३) योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करतांना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील.
४) योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करुन तो ऑनलाईन अपलोड करतील.
५) योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी/नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत, तसेच ते गुन्हेगारी स्वरुपाचे/गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येवून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
६) योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही.
उपसंचालक (माहिती), जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांची जबाबदारी:
१) विभागीय स्तरावर विभागीय संचालक / उपसंचालक (माहिती) या योजनेचे सनियंत्रण करतील. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा विभागीय स्तरावर घेतला जाईल.
२) जिल्हा माहिती अधिकारी हा सदर योजनेसाठी संबंधित जिल्हयाचा नोडल ऑफीसर असेल.
३) संबंधित जिल्हयातील योजनादूतांनी विहित नमुन्यात ऑनलाईन अपलोड केलेल्या त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा जिल्हा माहिती अधिकारी घेतील तसेच, संबंधित योजनादूतांना त्यांच्या कामकाजामध्ये मार्गदर्शन करतील.
८. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक (वृत्त) यांची नोडल
अधिकारी म्हणून जबाबदारी :
१) मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाशी संबंधित कामकाजाचे समन्वयन करणे.
२) प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी / उपसंचालक यांच्याकडून दैनंदिन आढावा घेणे. प्रत्येक जिल्ह्याने मुख्यालयाला साप्ताहिक अहवाल पाठविल्यानंतर त्याचे विश्लेषण करणे.
३) योजनादूत कार्यक्रमाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या बाह्यसंस्थेकडून अहवाल तयार करून घेणे. त्यानुसार राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे अथवा नाही हे तपासून त्याचा अहवाल करणे.
४) योजनादूतांची निवड, समुपदेशन व निर्देशन (Orientation) आणि उद्दिष्टाप्रमाणे कामकाज केल्याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्राप्त करणे.
५) योजनादूतांना त्यांचे मासिक मानधन विहित वेळेत अदा होते किंवा कसे याबाबत आयुक्त, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आयुक्तालय यांच्याकडे समन्वय साधून खातरजमा करणे व याबाबत काही अडचणी असल्यास त्याचे निराकरण करणे.
योजनादूत कार्यक्रमाच्या संचलनासाठी बाह्यसंस्थांमार्फत करावयाची कामे:-
१) उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे.
२) उमेदवारांच्या प्राप्त अर्जाची तसेच, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रांची छाननी करणे व पात्र उमेदवारांच्या नावांची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांना ऑनलाईन उपलब्ध करुन देणे.
३) निवडण्यात आलेले योजनादूत यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने समुपदेशन व निर्देशन (Orientation), कामकाजाचे वाटप इ. बाबतीत सनियंत्रण करणे.
४) योजनादूतांना कामाचे वाटप झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबतचा (हजेरी) ऑनलाईन पद्धतीने अहवाल घेणे. मुख्यालय स्तरावरील उपसंचालक (वृत्त) (नोडल ऑफीसर) यांना याबाबत आवश्यक असेल तेव्हा माहिती देणे. तसेच, उपस्थितीबाबतचा व अन्य बाबींचा साप्ताहिक अहवाल त्यांना सादर करणे.
५) योजनादूतांनी प्रत्येक दिवशी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल घेणे. तद्नंतर सदरचा अहवाल जिल्हा माहिती अधिकारी व नोडल ऑफिसर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांना पाठविणे.
६) योजनादूतांच्या मानधनाची देयके तयार करुन जिल्हा माहिती अधिकारी यांना सादर करणे. त्याव्यतिरिक्त अन्य प्रशासकीय बाबी सादर करणे.
योजनादूत (Yojana Doot Bharti) या कार्यक्रमाचे परिचालन बाहयसंस्थांमार्फत करण्याकरीता त्यांची नेमणूक करण्याची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी, शासनाने वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार करावी. त्यानुसार बाह्यसंस्थेमार्फत करावयाचे सर्व प्रकारचे तांत्रिक कामकाज, उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन (Orientation), उमेदवारांनी प्रत्यक्ष करावयाचे काम, उमेदवारांना मानधन देण्याची कार्यपद्धती इ. बाबत माहिती व जनसंपर्क महासंचानालयाकडून स्वतंत्रपणे निकष तयार करण्यात येतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस (Apply Online for Yojana Doot Bharti):
मुख्यमंत्री योजनादूत पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील मुख्यमंत्री योजनादूत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
https://www.mahayojanadoot.org/
वेबसाइटचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच, youth पर्यायावर क्लिक करा.
पुढे “Accept the Consent first before entering Aadhar number.” वर क्लिक करून आधार क्रमांक टाका.
आता नोंदणी पेज मध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर Register वर क्लिक करा व प्रोफाइल देखील अपडेट करा.
पुढे Matching Jobs वर क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील योजनादूत भरतीसाठी Apply करा.
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय – Yojana Doot Bharti GR:
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत (Yojana Doot Bharti) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – माझा लाडका भाऊ योजना – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ऑनलाईन अर्ज सुरु !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!