स्पर्धा परीक्षावृत्त विशेष

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु – २०२१-२२

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यानुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शासकीय, अनुदानित आणि खाजगी शिक्षण संस्थांमधून शिकत असणाऱ्या अनुसूचित/आदिम जमातीच्या इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील नाशिक विभागांतर्गत 17, ठाणे विभागांतर्गत 08, अमरावती विभागात 04 आणि नागपूर विभागांतर्गत 10 अशा एकूण 39 एकलव्य मॉडेल निवासी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निवासी शाळेत इयत्ता 6 वी मध्ये नियमित प्रवेश घेण्यासाठी आणि इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या तसेच इतर शासनमान्य अथवा खाजगी, अनुदानित शाळेत शिकत असणारा कोणताही अनुसूचित जमातीचा विद्यार्थी हे आवेदनपत्र भरू शकेल. तसेच इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आणि आदिमकरिता प्रत्येक शाळेत 5 जागा आरक्षित असणार आहेत. ऑनलाईन प्राप्त आवेदनपत्रातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पालकांच्या मूळ राहिवासचा पत्ता विचारात घेऊन नजिकच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत उपलब्ध जागेनुसार प्रवेश देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालये यांच्याशी संपर्क साधण्यात यावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेश अर्ज (शैक्षणिक वर्ष २०२१-२२):

>

प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांनी https://admission.emrsmaharashtra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदनपत्र 31 ऑगस्ट 2021 पर्यंत विद्यार्थ्याच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या गुणपत्रक व विद्यार्थ्याच्या सरल आयडी सह अपलोड करावे, असेही आदिवासी विकास आयुक्त श्री. सोनवणे यांनी सांगितले आहे.

प्रवेश अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या बाबी:

१. प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा सरल / स्टुडन्ट आयडी माहित असणे आवश्यक आहे.

२. अर्जदार विद्यार्थी अनुसूचित / आदिम जमातीचा असावा.

३. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु -सहा लाखापेक्षा कमी असावे.

४. विद्यार्थ्यांची निवड मागील वर्गातील वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्यात येईल.

५. विध्यार्थ्यांच्या शाळेची निवड अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यानुसार करण्यात येईल.

६. विद्यार्थ्यास एकूण ९०० पैकी प्राप्त गुण नमूद करावे लागतील , त्याचप्रमाणे संबंधित इयत्तेचे गुणपत्रक प्रवेश अर्जासोबत अंतर्भूत (Upload) करावे लागेल.

७. जर तुमची मार्कशीट ग्रेड सिस्टीममध्ये असेल तर कृपया मार्कांसह तुमची नवीन मार्कशीट गोळा करा आणि नंतर अपलोड करा अन्यथा ग्राहय धरले जाणार नाही.

८. अर्जदार विद्यार्थी आदीम जमातीचा असल्यास त्याबाबत अर्जामध्ये नोंद करण्यात यावी.

९. अर्जदार विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबत अर्जामध्ये नोंद करण्यात यावी.

१०. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31-08-2021 ही आहे . मुदतीनंतर ऑनलाईन अर्ज भरावयाची लिंक बंद होईल याची कृपया दक्षता घ्यावी.

११. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास 8788442237 या नंबर शी संपर्क करावा.

हेही वाचा – बारावीचा निकाल उद्या ३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन जाहीर होणार (HSC Result 2021)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “एकलव्य मॉडेल निवासी शाळेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु – २०२१-२२

  • Pawara Avinash

    Changli school aahe

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.