जिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना – Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे इयत्ता १२ वी नंतर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तसेच महानगरपालिका, विभागीयस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तरापासुन पाच कि.मी. परिसरामध्ये स्थापित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी (२०२२-२३) पात्र विद्यार्थ्यांकडून दि. ३१ ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करुन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन भरलेला अर्ज व अपलोड केलेले दस्ताऐवज ऑफलाईन कॉलेज मार्फत कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना – Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana:

ऑनलाईन दस्तऐवज अपलोड करण्याची मुदत : दि.३१ ऑक्टोंबर पर्यंत

अटी व शर्ती :

१. विद्यार्थी/ विद्यार्थिनी हे अनुसूचित जमातीचे असावे.

२. जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

३. पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखाच्या आत असणे आवश्यक.

४. विद्यार्थ्याचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते असणे बंधनकारक आहे व खाते आधार कार्डशी सलंग्न असावे.

५. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी असेल अशा शहरात विद्यार्थ्याचे पालक रहिवासी नसावेत.

६. विद्यार्थी इ. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ७ वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल.

७. विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे.

८. विद्यार्थ्याची संस्थेमधील/महाविद्यालयातील उपस्थिती ८० टक्के पेक्षा अधिक असणे आवश्यक.

९. महाविद्यालय हे मान्यताप्राप्त असावे.

१०. विद्यार्थ्याने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज करून – जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, प्रवेश पावती/बोनाफाईड, मागील वर्षाची मार्कशिट, राष्ट्रीयकृत बॅंकेचे खाते बुक आधारसलग्न असलेले हे मुळदस्ताऐवज स्कॅन ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे.

११. महाविद्यालयाने विद्यार्थ्याने भरलेला ऑनलाईन अर्ज विहित दस्ताऐवजांची पडताळणी करून ऑनलाईन व हार्डकॉपी प्रकल्प अधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.

१२. विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.

१३. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी, व्यवसाय करत नसावा.

१४. एका शाखेची पदवी मध्येच सोडुन दुसऱ्या शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतल्यास किंवा एका शाखेची पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर इतर शाखेच्या पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.

१५. केंद्र शासनाच्या पोस्ट बेसिक मॅट्रीक शिष्यवृतीकरीता निश्चीत करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेतंर्गत लाभ देण्यात येईल.

१६. दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

१७. विद्यार्थ्याने त्याचे स्वयंघोषणापत्र व वडिलांचे घोषणापत्र ऑनलाईन व हार्डकॉपी सादर करणे बंधनकारक राहील.

१८. या योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणुक केल्याचे आढळल्यास संबंधीत विद्यार्थी व शैक्षणिक संस्था या कायदेशिर कारवाईस पात्र राहील.

तरी पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आधी ऑनलाईन व नंतर ऑफलाईन पद्धतीने आपापल्या महाविद्यालयात सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.

विद्यार्थांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना किंवा वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना विदयार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी:

१. विदयार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी/पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना अर्ज ऑनलाईन https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावरुन सादर करावेत, विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना किंवा वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करता येईल, सदर प्रवेश अभ्यासक्रम असलेल्या कालावधीसाठी ग्राह्य असेल. सादर केलेल्या योजनेत अर्ज मंजुर केला असता अभ्यासक्रम संपेपर्यंत योजना बदलता येणार नाही.

२. अर्ज सादर करताना तयार केलेला लॉगिन Login Id आणि Password कायमस्वरुपी लक्षात ठेवावा, त्यासाठी दैनंदिनी मध्ये लिहुन ठेवावा.

३. लॉगिन केल्यानंतर Aadhar Authentication Status ला Click करुन आधार क्रमांक टाकावा आणि आधार लिंक करावे. Aadhar Link साठी OTP येत नसल्यास, Error येत असेल तर आधार सुविधा केंद्रातुन आपले अचुक नाव, जन्मतारीख, लिंग, फोटो आणि मोबाईल क्रमांक (शक्य असल्यास ई – मेल आय.डी.) अदयावत करुन पुनःश्च लॉगिन करुन Aadhar Authentication ला Click करून Aadhar लिंक करावे.

४. विद्यार्थांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना किंवा वसतीगृह योजना निवडल्यास प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यानी Student मध्ये New पर्याय निवडवा, जुन्या विदयार्थ्यानी ( २ – या आणि ३ – या वर्षासाठी प्रवेश अर्ज सादर करणा-या ) Renewal पर्याय निवडुन ऑनलाईन अर्ज सादर करावा.

५. ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी, भरलेली माहिती तपासून पहावी, जसे की,

 • नावाचे स्पेलिंग, लिंग, आधार क्रमाक, जन्मतारीख, वडीलांचे/आईचे पुर्ण नाव.
 • संपुर्ण पत्ता : घर क्रमांक, घराजवळची खुण, जन्मतारीख, गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड इत्यादी.
 • मोबाईल क्रमांक ( स्वतःचा आणि पालकांचा ) तसेच स्वतःचा किंवा पालकांचा ई – मेल आय.डी.
 • जात प्रवर्ग आणि जात ( जात दाखल्याप्रमाणे ), आदिम ( Primitive Tribe ) असल्यास YES नसल्यास No करावे. ( महाराष्ट्रात ३ आदिम जमाती / Primitive Tribe १. माडिया गोंड २. कोलाम . ३ कातकरी )
 • वार्षिक उत्पन्न ( वर्ष २०२१-२२ तहसिलदार यांच्या उत्पन्न प्रमाणपत्राप्रमाणे ), रुपये २०,०००/पेक्षा कमी उत्पन्न असल्यास, बीपीएल- Yes, BPL प्रमाणपत्र क्रमांक अचुक टाकावा.
 • जात दाखला/जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक, आई/वडिलांचा आधार क्रमांक ( बारकोड असणारे जात प्रमाणपत्र )
 • दिव्यांगाचे प्रमाणपत्र असल्यास YES ( शासकीय रुग्णालयाचे अदयावत प्रमाणपत्र आवश्यक ), नसल्यास No.
 • अनाथ/Orphan असल्यास YES ( महिला व बाल विकास विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक ), नसल्यास No.
 • महाविदयालयातील आणि अभ्यासक्रमाचे नाव, अभ्यासक्रम कालावधी, सध्याचे शिक्षण घेत असलेले वर्ष.
 • महाविदयालयातील प्रवेश ( प्रवेश पावती प्रमाणे ) प्रवेश पावती क्रमांक, यापुर्वी वसतीगृहात प्रवेशित असल्यास संपुर्ण तपशिल.
 • प्रवेश हव्या असलेल्या वसतिगृहाची निवड करावी. ( महाविदयालय व वसतीगृह एकाच शहरात / गावात असावे.)
 • यापुर्वी प्रवेशित असलेल्या शाळा / महाविदयालयाचे नाव, अभ्यासक्रम, कालावधी आणि गुण.
 • SSC उत्तीर्ण तपशिल : बोर्ड, परिक्षेचा महिना – वर्ष, बैठक क्रमांक.

बँक खात्याचा तपशिल :

 • १. राष्ट्रीयकृत बँकेत स्वतःचे स्वतंत्र आधार संलग्न बँक खाते असावे.
 • २. आधार क्रमांकावरील नावाचे, बँक खात्यावरील नावाचे, अर्जावरील नावाचे स्पेलिंग सारखे असावे.
 • ३. बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक IFSC Code ( बँकेचे इतर बँकेत विलनीकरण झाली असल्यास अदयावत बँक पासबुकची प्रिंट काढुन IFSC Code / MICR Code भरावा.
 • वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत निवड न झाल्यास पंडीत दिनदयाळ स्वंयम योजनेस अर्ज स्थांनातरीत करण्याच्या अनुषंगाने पर्याय YES करावे, आवश्यकता नसल्यास No. करावे. ( No पर्याय निवडणा-या विदयार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश न मिळाल्यास स्वयंम योजनेसाठी स्थानातरीत करण्यात येत नाही. )

६. ऑनलाईन अर्ज Submit केल्यानंतर खालील आवश्यक मुळ कागदपत्रे ( ORIGINAL ) UPLOAD करावीत.

 • संपुर्ण आधार कार्ड Original ( पुढील आणि मागील बाजु ) PDF / JPEG स्वरुपात.
 • जात प्रमाणपत्र आणि ( असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ) एकत्र Original PDF / JPEG स्वरुपात.
 • महाविदयालय प्रवेश पावती/आणि बोनाफाईड सर्टिफिकेट Original ( दोन्ही एकत्र PDF ) वसतिगृह प्रवेशासाठी Fit असल्याबाबत शासकीय वैदयकीय प्रमाणपत्र. Original
 • पालकांचा उत्पन्न दाखला ( तहसिलदारांचा नोकरदार पालक From No.१६ Original. ( आईच्या नावाने उत्पन्न दाखला असेल तर वडिलांचा मृत्यु दाखल्याची प्रत )
 • बँक पासबुक Scan Cope Original.
 • मागील वर्षाच्या परिक्षेचा निकाल Original. ( दोन सेमिस्टर असल्यास दोन्ही एकत्र PDF ).
 • SSC पासिंग सर्टिफिकेट Original.
 • सध्याच्या शैक्षणिक प्रवेशापुर्वीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/TC Original. ( Original TC महाविदयालयात सादर केली असल्यास प्राचार्यानी सांक्षाकित केलेली प्रत)
 • शिक्षणात खंड/गॅप असल्यास तसे प्रतिज्ञापत्राची/प्रमाणपत्राची प्रत. लागु असल्यास दिव्यांगात्वाचे प्रमाणपत्र अनाथ असल्यास अनाथाचे प्रमाणपत्र.

Upload केलेले सर्व कागदपत्रे Download करुन तपासुन पहावीत, Upload केलेली कागदपत्रे वाचता येणे आवश्यक आहेत. तदनंतर ऑनलाईन अर्ज Final Submit करावा.

७. ऑनलाईन अर्ज करताना काही कागदपत्रे व्यवस्थित Upload झाली नसल्यास किंवा चुकीचे कागदपत्र Upload झाले असल्यास Edit Documents हा पर्याय निवडुन अदयावत कागदपत्रे Upload करावीत.

८. जुन्या प्रवेशित विदयार्थ्यांना त्यांच्या Upload केलेल्या कागदपत्रांमध्ये बदल करावयाचा असलयास अर्ज Final Submit केल्यानंतर Edit Documents हा पर्याय निवडुन अदयावत कागदपत्रे Upload करावीत.

९. निवड केलेल्या वसतीगृहात उपरोक्त अर्जाची प्रत, आवश्यक सर्व कागदपत्रांच्या छांयाकीत प्रती ( स्वंयसाक्षांकित / Self – Attested ) या ७ दिवसात सादर कराव्यात. तसेच वसतीगृहाचा संपर्क क्रमांक आपल्या दैनंदिनीमध्ये लिहुन ठेवावा.

१०. ऑनलाईन अर्ज सादर करताना आपण प्रवेशीत असलेल्या महाविदयालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव संकेतस्थळावर दिसणे आवश्यक आहे, अभ्यासक्रम तपशिल निवड करण्यासाठी दिसत नसेल तर प्रकल्प् कार्यालयाशी संपर्क करावा. तदनंतर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

११. जुन्या प्रवेशित विदयार्थ्यांचा लॉगिन आय. डी. मोबाईल क्रमांक बंद झाला असलयास त्यांनी अर्ज ऑनलाईन सादर करण्यापुर्वी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क करुन लॉगिन हे नविन मोबाईल क्रमांकावर Transfer करुन घ्यावे.

१२. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर https://swayarm.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन अर्जाची सदयस्थिती किमान दर ७ दिवसांनी तपासावी, अर्जात काही चुक झाली असल्यास वसतीगृह / कार्यालयाकडुन कारण लिहुन अर्ज विदयार्थ्यांच्या लॉगिनला Send Back केला जातो, सदर अर्ज कारणाप्रमाणे आवश्यक बदल करून अर्ज Resubmit करावा.

१३. नवीन विदयार्थ्यांची वसतीगृह प्रवेश प्रक्रीयेत निवड झाल्यास, कॉल लेटर Download करुन ७ दिवसात वसतीगृहात प्रवेशासाठी हजर व्हावे. पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी निवड झाल्यास अर्ज स्तिथी ” Approved by PO ” असे दिसेल.

१४. वसतीगृह प्रवेश प्रक्रिया पुर्ण होऊन जागा शिल्लक नसल्यास, सदर विदयार्थ्यांना वसतिगृह स्वयंम योजनेच्या लाभासाठी त्यांचे अर्ज महाविदयालयांकडे स्वंयम योजनेची पात्रता पाहुन वर्ग केले जातात, स्वयंम योजनेच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे विदयार्थ्यांनी ऑनलाईन Upload करुन महाविदयालयास सादर करावीत.

१५. विदयार्थी हे Net Café मधुन अर्ज सादर करतात. सदर अर्ज विदयार्थ्यांनी स्वतः तपासुन आवश्यक सुधारणा तात्काळ करुन घ्याव्यात. Net Café चालकाच्या चुकीमुळे आपण योजनेच्या लाभांपासून वंचित राहु शकता याची नोंद घ्यावी.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

पालकाचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र नमुना: पालकाचे घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.