वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

पॅरामेडिकलविषयक प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन (Paramedical Training)

कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअरविषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास स्वारस्य असलेल्यांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

या योजनेत 18 ते 45 वर्ष वयोगटातील युवा-युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खासगी रुग्णालयामधील क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देवून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे.

प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असणाऱ्यांनी खालील लिंकवर त्वरित आपली नोंदणी करावी. 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfXlE-35EmeZdNCQvmuCLgcc3Qqn89ULU7IY6YSfakEBJHrXA/viewform

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहिल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर, शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा – परदेशात शिक्षणासाठी निवास आणि भोजनाच्या खर्चासह शिष्यवृत्ती; ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार (Foreign Education Scholarship)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.