आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

पीएम किसान योजनेअंतर्गत e-KYC साठी मुदतवाढ – PMKisan eKYC

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये ) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात रू. ६०००/- प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येत आहे.

पीएम किसान योजने अंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( PM KISAN ) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे e-KYC पडताळणी दिनांक ३१ जुलै, २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तथापी, सदरची e – KYC पडताळणी पुर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने आता दिनांक ३१ ऑगस्ट. २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर किंवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत e-KYC पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वतःच्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची e-KYC पडताळणी करता येईल.

पीएम किसान पोर्टलवरील e-KYC करतांना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वत:चे -KYC पडताळणी करता येईल. यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभाची Biometric पद्धतीद्वारे e-KYC पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रू. १५/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येईल.

PMKisan eKYC Notification (PM किसान eKYC अधिसूचना):

eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. OTP Based eKYC is available on PMKISAN Portal. or nearest CSC centres may be contacted for Biometric based eKYC.
Deadline of eKYC for all the PMKISAN beneficiaries has been extended till 31st August 2022.

लाभार्थ्यांनी स्वतः अथवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून त्यांचे e-KYC पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ मुदतीपूर्वी पुर्ण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा – PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.