नोकरी भरतीमहानगरपालिकावृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

पुणे महानगरपालिकेत भरती – PMC Recruitment 2022

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट -२ व गट -३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे.

वर्ग -२ मधील ४ पदे व वर्ग -३ मधील ४४४ पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. २०/०७/२०२२ पासुन ते दि. १०/०८/२०२२ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. १०/०८/२०२२ रोजीचे २३:५९ वाजे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या पोर्टलवर किंवा खालील जाहिरातीमध्ये पाहण्यास उपलब्ध आहेत.

पुणे महानगरपालिकेत भरती – PMC Recruitment 2022:

जाहिरात क्र.: 1/398

एकूण जागा: 448 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहाय्यक विधी अधिकारी04
2लिपिक टंकलेखक200
3कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)135
4कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)05
5कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)04
6सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक100
एकूण जागा448

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) विधी शाखेची पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
  3. पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा +05 वर्षे अनुभव  किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
  5. पद क्र.5: (i) B.E/B.Tech (सिव्हिल)/B. आर्किटेक्चर (ii) M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य

वयाची अट: 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹500/-]

नोकरी ठिकाण: पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

परीक्षा (ऑनलाईन): ऑगस्ट/सप्टेंबर 2022

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती – Sports Authority of India Recruitment 2022 

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.