नोकरी भरतीमहानगरपालिकावृत्त विशेष

पुणे महानगरपालिकेत भरती – PMC Recruitment 2022

आरोग्य खाते पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखालील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधील ५४ आरोग्यवर्धिनी केंद्र करिता खालील नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांना योग शिक्षक पदाच्या थेट मुलाखतीसाठी बोलविण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेत भरती – PMC Recruitment 2022:

एकूण जागा: 54 जागा

पदाचे नाव: योगशिक्षक

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) योगशिक्षक प्रमाणपत्र

वयाची अट: 18 ते 45 वर्षे.

नोकरी ठिकाण: पुणे

फी : फी नाही.

थेट मुलाखत: दिनांक : – ०१/०९/२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांनी आपली वरीलप्रमाणे कागदपत्रे घेऊन स्वतः मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीचे ठिकाण: इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.

अटी व शर्ती :

१) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत भरण्यात येणाऱ्या सर्व उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल.

२) सदरील पदे एन यु एच एम समिती अंतर्गत राहतील, त्याचा पुणे महागनरपालिकेच्या आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.

३) सदर पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाने रु. २५० प्रती योग सत्र या दराने केवळ दिनांक ३१/०३/२०२३ पर्यंतच भरावयाचे असून येत्या वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखड्यात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल. सन २०२२-२३ च्या कृती आराखड्यामध्ये मंजूर होणाऱ्या योगसत्रांच्या संख्येनुसार नियुक्त होणाऱ्या योगशिक्षकांना योग सत्रे विभागून देण्यात येतील.

४) मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील कागदपत्र घेऊन स्वखर्चाने मुलाखतीस हजर रहावे. अ) आधार कार्ड/ओळखपत्र. ब) मिनिस्ट्री ऑफ आयुप अथवा योगा सर्टीफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे योगशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र. क) १० वी ची मार्कलीस्ट. ड) शासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक

५) शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल.

६) सदर पदासाठी सामजिक आरक्षण लागू राहणार नाही.

७) निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी राखून ठेवले आहेत.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – संरक्षण संशोधन व विकास संघटनेत मेगा भरती – DRDO CEPTAM Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.