नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा; प्रवेशपत्र (Hall Ticket) डाऊनलोड करा !

सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई पद प्रवेशपत्र (Hall ticket) डाऊनलोड करा:

अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.cbtexam.in या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा 13 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज या परीक्षा केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत 18002100309, पोलीस भरती मदत केंद्र कक्ष 02362 – 228008/ सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष – 02362 – 228614 आणि [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही एस. बी. गावडे प्रभारी पोलीस उप अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

हेही वाचा – MPSC भरती 2021- MPSC Recruitment 2021 Apply Online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.