नोकरी भरतीवृत्त विशेष

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती – SMMURBAN Recruitment 2021

संपूर्ण देशात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान (SMA) सुरू करण्यात आले. हे मिशन भारतातील सर्व शहरांमध्ये लागू केले जाईल. स्वच्छ महाराष्ट्र मिशन शहरी विकास विभाग अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत, सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती – SMMURBAN Recruitment 2021:

अपेक्षित कामाचे स्वरूप : उमेदवाराची नियुक्ती होईल त्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या खालील विषयांची अनुषंगीक कामे:

>
  1. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ संबंधित अनुषांगिक कामे
  2. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, अनुषंगीक कामे
  3. हागणदारी मुक्त शहरासंबंधीची कामे (ODF, ODF +/ ++, Water +) संबंधित अनुषांगिक कामे.
  4. कचरा मुक्त शहरांच्या तारांकित मानांकना संबंधित अनुषांगिक कामे.
  5. मुख्याधिकारी यांनी नेमून दिलेली स्वच्छ सर्वेक्षण संबंधित अनुषांगिक कामे.
  6. वरीष्ठ कार्यालयाशी समन्वय साधणे.
  7. स्वच्छ सर्वेक्षण टूलकीटनुसार कामे करण्यास नगरपरिषदेस सहकार्य करणे.
  8. MIS भरणे.

उमेदवारांसाठी सूचना:

  1. कंत्राटी तत्वावरील सदर नियुक्तीसाठी ऑनलाइनच अर्ज करावयाचा आहे.एका उमेदवाराने एकच अर्ज करावयाचा आहे. एकाहून अधिक अर्ज प्राप्त झाल्यास फक्त प्रथम प्राप्त अर्जावर कार्यवाही केली जाईल.
  2. अर्जात उमेदवारास आपल्या पसंतीचा महसूली विभाग नमूद करावयाचा आहे.
  3. प्रथम पसंतीच्या महसूली विभागात संबंधित उमेदवारास ऑनलाइन मुलाखत द्यावी लागेल.
  4. कंत्राटी तत्वावरील सदर नियुक्तीसाठी महसूली विभागात संबंधित विभागीय सहआयुक्त, नगर प्रशासन यांच्या अंतर्गत निवड समिती मार्फत ऑनलाइन मुलाखत (Video Conference) घेतली जाईल. ऑनलाइन मुलाखतीचा वेळ, दिनांक व लिंक आपणास स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
  5. या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या पात्र उमेदवारांची कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी संबंधित नागरिक संस्थेकडे विभागीय सहआयुक्त, नगर प्रशासन यांचे मार्फत शिफारस करण्यात येईल.
  6. सदर शिफारसीनुसार संबंधित नागरिक संस्थेमार्फत संबंधित उमेदवारांस कंत्राटी तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल.
  7. संबंधित नागरिक स्वराज्य संस्थेमार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यावर उमेदवारास तात्काळ नियुक्ती दिलेल्या शहरात रुजू व्हावे लागेल.
  8. नियुक्तीच्या ठिकाणात बदल करण्यात येणार नाही.
  9. शहरांची संख्या व आवश्यक पद संख्येत बदल होऊ शकतो.

एकूण जागा: 408 जागा

पदाचे नाव: शहर समन्वयक (City Coordinator)

शैक्षणिक पात्रता:

(i) B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning

(ii) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 06 महिने अनुभव

वयाची अट: 01 जून 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र राज्य.

फी: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website): अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अटी व शर्ती कंत्राटी:

  1. कंत्राटी तत्त्वावरील सदर नियुक्ती “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” अंतर्गत दि. ३१/०३/२०२२ किंवा स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ची तपासणी पूर्ण होई पर्यंत राहील.
  2. नियुक्ती कालावधी संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही.
  3. कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या सदर कर्मचाऱ्यांस शासकीय कर्मचाऱ्यांस मिळणाऱ्या कोणत्याही सोई सुविधांचा लाभ मिळणार नाही. / अनुज्ञेय असणार नाही.
  4. सदर नियुक्ती ही पूर्णतः कंत्राटी मानधन तत्वावर आहे.
  5. सदर मानधन संबंधित नागरिक स्वराज्यसंस्थेमार्फत अदा करण्यात येईल.
  6. उमेदवाराचे वय दि. १ जून २०२१ रोजी ३५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
  7. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वच्छ सर्वेक्षण विषयक केलेल्या कामकाजाच्या अनुभवाचा प्राधान्य असेल.
  8. सदर अटी, शर्ती व नियुक्ती प्रक्रियेत बदल करण्याचे तथा रद्द करण्याचे प्राधान्य अधिकार कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय यांनी राखून ठेवलेले आहेत.

हेही वाचा – भारतीय तटरक्षक दल भरती – Indian Coast Guard Recruitment 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.