एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ
रा.प. महामंडळाव्दारे ज्येष्ठ नागरिक तसेच इतर सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी मुदत दि. ३१.०५.२०२२ पर्यंत देण्यात आली होती. कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर तसेच रा.प महामंडळातील कर्मचा-यांनी केलेल्या संपामुळे आगार तसेच विभागीय कार्यालयात स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण प्रक्रिया होऊ शकली नाही.
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ:
सदर कारणास्तव या योजनेला दि.३०.०६.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार विभागांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
१. ज्येष्ठ नागरिक यांस स्मार्टकार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी दि. ३०.०६.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. सदरची मुदतवाढ ही अंतिम असेल यानंतर मुदत वाढ देण्यात येणार नाही.
३. दि. ०१.०७.२०२२ पासून रा.प प्रवासासाठी स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.
४. दि. ३०.०६.२०२२ पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरिता सध्याची प्रचलीत असलेली ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येऊन प्रवास करण्यास मुभा देण्यात यावी. यानंतर दि. ०१.०७.२०२२ पासून सद्या प्रचलित असलेली ओळखपत्रे रा.प प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
५. तसेच आगारातील ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्ड तातडीने संबंधितांस वितरीत करण्याबाबत व आगारात कोणत्याही लाभार्थ्याचे स्मार्टकार्ड शिल्लक राहणार नाही अशा सुचना आगार व्यवस्थापक यांना देण्यात याव्यात.
६. सदर मुदतवाढीबाबत व ज्येष्ठ नागरिक स्मार्टकार्ड नोंदणीकरण आगारात प्राप्त झालेली स्मार्टकार्ड ज्येष्ठ नागरिकांनी घेऊन जाणेबाबत विभाग नियंत्रक/आगार व्यवस्थापक यांनी स्थानिक पातळीवर प्रसिद्धी द्यावी.
विभाग नियंत्रक यांनी विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय लेखाधिकारी, आगार व्यवस्थापक, आगार लेखाकार, स्थानक प्रमुख यांना सदर मुदतवाढीबाबत सविस्तर सुचना द्याव्यात. आगार व्यवस्थापकांनी प्रस्तुत मुदतवाढीची माहिती सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी व चालक/ वाहक यांना व्हावी या हेतुने कर्मचारी सुचना फलक, रोकड व तिकिट विभाग, स्थानक प्रमुख कार्यालय, प्रवासी सुचना फलक इ. ठिकाणी वाचनीय व दर्शनीय स्वरुपात प्रसिद्ध करण्यात यावी.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!