एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ

कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आणि राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे (Strike) आगार तसेच विभागीय कार्यालयात स्मार्टकार्ड नोंदणीकरण (Smartcard Registration) व वितरण प्रक्रिया होऊ शकलेली नाही.

त्यामुळे जेष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या स्मार्ट कार्ड योजनेला 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब (Dr Anil Parab) यांनी दिली. तर 1 जून पासून मात्र, राज्यात स्मार्ट कार्ड बंधनकारक राहिल असेही परब यांनी सांगितले आहे.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देत आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली.

त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची स्मार्ट कार्ड नोंदणी होऊ शकली नाही. त्यामूळे जेष्ठ नागरिकांना आता आगार स्तरावर 31 मे पर्यंत स्मार्टकार्डासाठी नोंदणी करता येणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा – IRCTC ची ऑनलाईन बस तिकीट बुकिंग सेवा सुरू; अशी करा ऑनलाईन IRCTCची बस तिकीट बुक – IRCTC Bus Ticket Booking Online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.