या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ; शासन निर्णय जारी

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णया मधील सदर अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे त्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास दि. १३/०९/२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय समितीने विदर्भ व मराठवाडयातील १४ जिल्हयांतील ३७४९ कर्जदार शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज रक्कम रु. ९.०४ कोटी कर्जमाफीसाठी पात्र असल्याची शिफारस केली आहे. सदर कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रु. ५.०० कोटी इतक्या रक्कमेची तरतूद करण्यात आलेली असून वित्त विभागाने दि. १४/१०/२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर तरतूदींपैकी ५०% निधी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार रु.२.५० कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील मंजूर तरतूदीमधून रु.२.५० कोटी इतका निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

सदर तरतूद खर्च करण्यासाठी (Vo००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन) सहकार आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच लेखाधिकारी अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

सदर निधी आहरण करुन हा खर्च वेळेत होईल हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे पाहतील. तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठविली जाईल” “सदर खर्च हा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या विभागाच्या मागणी क्र. व्ही -२, २४२५, सहकार ( ०० ) ( ०१ ) परवानाधारक सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड ( कार्यक्रम ) ( दत्तमत ) ३३ अर्थसहाय्य ( २४२५२४४४ ) या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ या वर्षासाठी मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात येणार.

उक्त निधी वितरीत करताना दि. १०/०४/२०१५ व दि. १३/०९/२०१९ रोजीचा शासन निर्णय मध्ये नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करुन त्यानुसार अटी / शर्तीची तंतोतंत पुर्तता झाल्यानंतरच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी अनुदानाचे वाटप करणार. तसेच सदर योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजनेचे संनियंत्रण करून सदर निधीमधून वितरीत करण्यात आलेल्या रकमेबाबतचा जिल्हानिहाय तपशीलवार अहवाल प्रतीमहा शासनास सादर करणार.

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग शासन निर्णय:

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत दि. 23-11-2021 रोजीचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आठवी यादी जाहीर २०२१ – Mahatma Jyotiba Phule Karj Mafi (MJPSKY) List 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

One thought on “या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ; शासन निर्णय जारी

  • November 24, 2021 at 3:17 pm
    Permalink

    Project is good but the government officials should be very alert to allotment of home. They should not blindly believe on anyone for allotment. The suspense scrutiny should be there for the same in documentation.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.