ठाणे महानगरपालिका – NHM अंतर्गत 124 जागांसाठी भरती – TMC Recruitment 2022

ठाणे महानगरपालिका ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) ठाणे महानगरपालिका, ठाणे खालील संवर्गातील रिक्त पदे करार पध्दतीने भरावयाची असून त्याकरिता पात्र व इच्छूक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात मागविण्यात येणार आहेत.

ठाणे महानगरपालिका-NHM अंतर्गत 124 जागांसाठी भरती – TMC Thane Recruitment 2022:

अटी व शर्ती

१) अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२) अर्जदाराचे अर्जा सोबत प्रमाणपत्राच्या साक्षंकित सत्य प्रती जोडाव्यात.

  • आधारकार्ड
  • जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक अर्हता शेवटच्या वर्षाची मार्कशिट
  • अतिरिक्त शैक्षणिक अर्हता असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र व मार्कशिट
  • महाराष्ट्र नर्सिंग काऊंसिल नोंदणी प्रमाणपत्र,
  • जातीचे प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला

३) अर्जामध्ये संपुर्ण नाव, पत्ता, जन्मतारिख, शैक्षणिक अर्हता, पुर्वानुभव नमुद करावा, तसेच अर्जासेबत पासपोर्ट आकाराचा फोटो जोडावा.

४) अनु.क्र १,२ या पदासाठी नोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

५) नेमणूकी संदर्भात ठाणे महागनरपालिकेने घेतलेले सर्व निर्णय अंतिम राहतील.

६) शासकिय/निमशासकिय सेवेत असलेल्या उमेदवारांनी कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

७) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत सदरची पदे करारपध्दतीने अस्तित्वात राहतील तसेच नेमणूक झालेल्या उमेदवारास ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत कोणताही हक्क सांगता येणार नाही.

८) नियुक्त झालेल्या उमेदवारांना ११ महिन्यांकरिता नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्याचा Performance Report नुसार पुर्ननियुक्ती देण्यात येईल.

९) एका पदासाठी १० किंवा १० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या त्या संवर्गात एका पदासाठी गुणवतेनुसार कट ऑफ लाऊन एकास पाच या प्रमाणात पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

१०) मुलाखतीची तारिख व वेळ उमेदवारांस इमेलद्वारे कळविण्यात येईल तसेच ठाणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल.

११) मुलाखतीनंतर निवड यादी व प्रतिक्षा यादी संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल तसेच निवड झालेल्या उमेदवारास ईमेलद्वारे नियुक्ती आदेश पाठविण्यात येतील.

१२) जाहिरातीमध्ये प्रसिध्द केलेल्या पदांमध्ये वाढ/कमी करण्याचे अधिकार महापालिकेने राखून ठेवलेले आहेत तसेच जाहिरातीत काही सुधारणा असल्यास तसे शुध्दिपत्रक प्रसिध्द करण्यात येईल.

१३) उमेदवाराने विहित नमुन्यातील आपले अर्ज वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे नावाने सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – ४००६०२ या पत्यावर दिनांक २३/०२/२०२२ ते ०२/०३/२०२२ रोजी सांयकाळी ४.०० वाजेपर्यंत पोस्टाद्वारे/थेट बंद लिफाफ्यात सादर करावीत. लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे, हे नमूद करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

एकूण जागा: 124 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रसाविका (ANM) 103
2 परिचारीका (GNM) 21
एकूण जागा 124

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 – प्रसाविका (ANM): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM नर्सिंग कोर्स.
  2. पद क्र.2 – परिचारीका (GNM): (i) 12वी उत्तीर्ण   (ii) B.Sc नर्सिंग /GNM कोर्स.

वयाची अट: 65 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: ठाणे

फी: फी नाही.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2022 (04:00 PM).

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-400602.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाणार ! (Police Patil Recruitment)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.