महाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या दि. २ ऑक्टोंबर रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन करणेबाबत शासन परिपत्रक

ग्रामसभा हा पंचायतराजचा गाभा आहे. पंचायतराज व्यवस्थेतील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा् परिषद यांचा कारभार लोकप्रतिनिधींव्दारे चालतो. म्हणजेच निवडणुकीद्वारे मतदान करुन आपण आपले प्रतिनिधींव्दारे चालतो. आपण आपले प्रतिनिधी निवडतो. आपण देशाचा, राज्याचा कारभार चालवण्यासाठीही खासदार, आमदारांना अशाच प्रकारे निवडणुकीव्दा्रे निवडुन देतो. आपले प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. ही प्रतिनिधिक लोकशाही झाली. आपला देश विस्तृत पसरलेला आहे. लोकसंख्याही प्रचंड आहे. त्या‍मुळे त्या ठिकाणी प्रतिनिधीक लोकशाही आवश्यक आहे. पण थेट लोकशाही गावपातळीवर येऊ शकते. लोकशाहीचे, सत्तेचे विकेंद्रीकरण गाव स्तरावर शक्य आहे. ग्रामसभा ही ख-या अर्थाने लोकशाही संस्था आहे. कारण गावातील प्रत्येक प्रौढ मतदार व्यक्ती त्या गावच्या ग्रामसभेची सदस्य असते. तिला ग्रामसभेला उपस्थित राहण्याचा, आपले मत मांडण्या‍चा अधिकार आहे.

ग्रामपंचायत ही भारतीय खेड्यांमधील एक मूलभूत ग्रामीण शासित संस्था आहे. ही भारतातील तळागाळातील पातळीवर लोकशाही रचना आहे. हे एक राजकीय संस्था असून, खेड्याचे मंत्रिमंडळ म्हणून काम करतात. ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सामान्य मंडळाचे काम करतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या दि. २ ऑक्टोंबर रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन करणेबाबत शासन परिपत्रक : 

दरवर्षी दि.२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम ७ अन्वये ग्रामसभा आयोजित केली जाते. तथापि, कोविड -१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर सदर ग्रामसभा आयोजित करावी किंवा कसे याबाबत काही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी विचारणा केलेली आहे.

या अनुषंगाने नमूद करण्यात येते कि, महाराष्ट्र शासनाच्या संदर्भाधीन आदेशान्वये कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. सदर बाब विचारात घेता, सूचित करण्यात येते की, Social Distancing चे व कोविड -१९ च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून दि.२ ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन/ ऑफलाईन ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात येत आहे.

शासन परिपत्रक : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या दि. २ ऑक्टोंबर रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन करणेबाबत शासन परिपत्रक:

हेही वाचा – ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व अटी (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.